शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

सहकारमंत्र्यांचा बंगला बेकायदेशीर! सोलापूर महापालिकेचा उच्च न्यायालयात अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 23:52 IST

राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी अग्निशामक दलास आरक्षित असलेली जागा खरेदी करून बांधलेल्या आलिशान बंगल्याचा बांधकाम परवाना बेकायदेशीर असल्याचा अहवाल सोलापूर महापालिकेने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात सादर केला.

सोलापूर : राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी अग्निशामक दलास आरक्षित असलेली जागा खरेदी करून बांधलेल्या आलिशान बंगल्याचा बांधकाम परवाना बेकायदेशीर असल्याचा अहवाल सोलापूर महापालिकेने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात सादर केला. यामुळे सहकारमंत्री देशमुख यांच्या पुढील राजकीय अडचणी वाढल्या आहेत.देशमुख यांनी होटगी रस्त्यावरील मोहितेनगर शेजारी आरक्षित भूखंड खरेदी करून टोलेजंग बंगल्याचे बांधकाम केले आहे. गुंठेवारी प्रकरणातील ही जागा असून, त्यावर अग्निशामक दलाचे आरक्षण असताना सन २००० मध्ये इथे एक खोली, शौचालय, बाथरूम बांधण्याचा परवाना महापालिकेच्या बांधकाम परवाना विभागाने दिला. याला सामाजिक कार्यकर्ते महेश चव्हाण यांनी न्यायालयात आव्हान दिले होते. यावर न्यायालयाने महापालिका आयुक्तांना आदेश देत अहवाल याबाबत मागितला होता. तत्कालिन आयुक्त विजय काळम यांनी निवडणुकांचे कारण सांगत ३१ मार्च २०१७ पर्यंत मुदत मागितली होती. त्यांनी विलंब केल्याने पुन्हा नितीन भोपळे यांच्यासह अन्य तिघांनी अवमान याचिका दाखल केली होती.२५ पानी अहवाल; जागेवर अग्निशमन दलाचे आरक्षणमहापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी उच्च न्यायालयात २५ पानी अहवाल सादर केला आहे. सहकारमंत्री देशमुख यांनी खरेदी केलेल्या जागेवर अद्याप अग्निशामक दलाचे आरक्षण आहे. ही जागा गुंठेवारीची आहे.महापालिकेच्या कायद्यात गुंठेवारीच्या जागेवर बांधकाम परवाना देण्याची तरतूद नसताना तत्कालिन अधिकाऱ्यांनी परवाना दिला. बांधकाम रिवाईज करण्याचा अर्ज केलेला नसताना बांधकाम विभागातील संबंधित तत्कालिन अधिकाºयांनी परवाना दिल्याचे दिसून येत आहे.जुनी परवानगी नियमानुसार नाही. गुंठेवारी नियमित केली असती तरी आरक्षणाची अडचण दूर झाली असती. पण गुंठेवारी कायद्यातील तरतुदीकडे दुर्लक्ष करून महापालिकेच्या बांधकाम विभागाने या जागेसाठी दिलेला बांधकाम परवाना बेकायदेशीर असल्याने तो रद्द करण्याची संबंधितांना नोटीस दिली आहे, असे अहवालात म्हटले आहे....तर राजीनामा देईन महापालिकेच्या परवानगीनेच बंगला बांधला आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करून यात काही गैर असल्यास स्वत:च बंगला तोडून, राजीनामा देईन. २००० साली होटगी रोड मजरेवाडी सब प्लॉट १० सिटी सर्वे नं. १४९/२अ / ३ येथील जमीन खरेदी केली. ही जमीन खरेदी केल्यानंतर सन २००४ रोजी बांधकाम परवाना मागितला असता या ठिकाणी आरक्षण असल्याचे समजले. ७/१२ वर आजपर्यंत कुठेही आरक्षण दिसत नाही. याबाबत होत असलेले आरोप सिद्ध झाल्यास मी राजीनामा देण्यास तयार आहे.- सुभाष देशमुख, सहकार व पणन मंत्री

टॅग्स :Subhash Deshmukhसुभाष देशमुखSolapurसोलापूर