शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

राज्यसभेसाठी सहकार्य करा, सफारी गाडी देऊ; उमेदवारानं दिली आमदारांना मोठी ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 10:14 IST

सहकार्य करून मला संसदेत पाठवावं. त्या आमदारांचे उपकार विसरणार नाही असं राज्यसभेची निवडणूक लढवणाऱ्या अरुण निटुरे यांनी सांगितले आहे.

मुंबई - राज्यसभेच्या सहा जागांच्या निवडणुकीसाठी राज्यात मोठी चुरस निर्माण झाली आहे. या निवडणुकीत भाजपानं तिसरा उमेदवार दिल्याने बिनविरोध निवडणूक होण्याची शक्यता मावळली आहे. सुरुवातीला संभाजीराजे यांनी या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उभं राहण्याची घोषणा केली होती. परंतु कुठल्याही पक्षाने संभाजीराजेंना थेट पाठिंबा न दिल्यानं अखेर या निवडणुकीतून माघार घेतली. 

राज्यसभेच्या ६ जागांसाठी महाविकास आघाडीने ४ उमेदवार दिले आहेत. मविआकडे ३ उमेदवार निवडून येतील इतकी मते आहेत. तर भाजपानेही या निवडणुकीत ३ उमेदवार देऊन चुरस निर्माण केली आहे. भाजपाकडे २ उमेदवार निवडून येण्याइतपत मतांचे संख्याबळ आहे. त्यामुळे सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपा आणि महाविकास आघाडी यांच्यात घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. त्यात अपक्ष आणि छोट्या पक्षाच्या आमदारांचा भाव चांगलाच वधारला आहे. 

आता या निवडणुकीत आणखी एक अपक्ष उमेदवार उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या उमेदवाराने जो कुणी आमदार त्यांना सहकार्य करेल त्यांना सफारी गाडी भेट देऊ असं आश्वासन दिले आहे. राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे अध्यक्ष अरुण निटुरे यांनी राज्यसभा निवडणूक लढवणार असल्याचं सांगितले आहे. अरुण निटुरे म्हणाले की, पक्षाच्यावतीने राज्यसभा निवडणूक लढवणार आहे. सर्व आमदारांनी आम्हाला सहकार्य करावं. शेतकऱ्याचा मुलगा म्हणून शेतकरी आमदाराने मतदान करावं असं आवाहन त्यांनी केले आहे. 

तसेच सहकार्य करून मला संसदेत पाठवावं. त्या आमदारांचे उपकार विसरणार नाही. जे आमदार मदत करतील त्यांना पक्षाच्या वतीने सफारी गाडी भेट देऊ. यासाठी ४५ वाहनांचे कोटेशन आणलं आहे. त्याची किंमत जवळपास ११ कोटीपर्यंत जाते. कार्यकर्त्यांच्या सहभागातून हे सहकार्य करू ही लालच नाही. गरीब शेतकऱ्याच्या मुलाला संसदेत पाठवावं ही हात जोडून विनंती असल्याचं अरूण निटुरे यांनी सांगितले.  

सहाव्या जागेसाठी चुरस राज्यसभा निवडणुकीत १३ अपक्ष आमदार व लहान पक्षांचे आमदार कोणाला कौल देतात यावर सहाव्या जागेचे भवितव्य अवलंबून असेल. आपल्या हक्काच्या मतांशिवाय अतिरिक्त मतांची तजवीज आम्ही केलेली आहे, असा दावा शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी केला आहे. भाजपचे दोन, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा एकेक उमेदवार  हे पहिल्या पसंतीच्या ४२ मतांचा कोटा मिळवून सहज जिंकतील.  निवडणूक गुप्त मतदानाने होत नाही. प्रत्येक पक्षाच्या आमदाराला त्याच्या पक्षाच्या प्रतिनिधीला आधी मत दाखवावे लागते आणि नंतरच ते मतपेटीत टाकावे लागते. पक्षाने ज्याला मत द्या म्हणून व्हिप जारी केलेला असतो त्याला मतदान करावे लागते आणि तसे केले नाही तर तुमची आमदारकी जाऊ शकते. मग या निवडणुकीत घोडे बाजाराला संधी आहे कुठे? तर ती आहे अपक्ष आमदारांच्याबाबत आणि लहान पक्षांबाबत. सर्व अपक्ष आमदार हे कोणत्या ना कोणत्या पक्षाचे सहयोगी सदस्य आहेत. मात्र, आपल्या सहयोगी पक्षाच्या  प्रतिनिधीला मत दाखविण्याचे बंधन त्यांच्यावर नाही.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभा