शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
2
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
3
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
4
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
5
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
6
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
7
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
8
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
9
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
10
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
11
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
12
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
13
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
14
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
15
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
17
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
18
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
19
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
20
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...

घुमानचे साहित्य संमेलन म्हणजे संत साहित्य संमेलन होणार

By admin | Updated: July 3, 2014 00:46 IST

यंदाचे ८८ वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादेत होणार; हेच जवळपास निश्चित करण्यात आले होते. पण ऐनवेळी पंजाबने उचल घेतली. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राच्या बाहेर साहित्य संमेलन झाले नाही.

राजेश पाणूरकर - नागपूरयंदाचे ८८ वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादेत होणार; हेच जवळपास निश्चित करण्यात आले होते. पण ऐनवेळी पंजाबने उचल घेतली. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राच्या बाहेर साहित्य संमेलन झाले नाही. संत नामदेवाच्या घुमान या गावी हे संमेलन घ्यावे, असा आग्रह काही महामंडळ सदस्यांनी केला. घुमान येथील आयोजकही पूर्ण तयारीनिशी तयार असल्याने यंदाचे साहित्य संमेलन पंजाबच्या गुरुदासपूर येथीव घुमान या गावी होणार आहे. संत नामदेवांच्या गावात हे संमेलन होत असल्याने हे साहित्य संमेलन संत साहित्यालाच अर्पण केलेले असेल, असा एकत्रित स्वर साहित्यिकांनी आळवला आहे. संत साहित्य संमेलन होण्यास कुणाचाही विरोध नाही. पण यामुळे संमेलनाध्यक्षपदासाठी असणारी गणितेच बदलली आहे. उस्मानाबाद येथे हे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असते तर संमेलनाध्यक्षपदासाठी इच्छुक असणाऱ्या साहित्यिकांनी आता माघार घेतली आहे. संत नामदेवांच्या गावात होणाऱ्या संमेलनासाठी बहुतेक संत साहित्यिकांनी कंबर कसली आहे. यात प्रामुख्याने पुण्याचे अशोक कामत आणि नागपूरचे डॉ. रवींद्र शोभणे इच्छुक आहेत. याशिवाय रामचंद्र देखणे, सदानंद मोरे, यशवंत पाठक यांनीही संमेलनाध्यक्ष होण्यासाठी तयारी दर्शविल्याचे कळले आहे. अद्याप कुणीही अधिकृतपणे समोर आलेले नाही आणि ती प्रक्रिया सुरूही झालेली नाही. पण घुमानला संमेलन निश्चित झाल्यावर संत साहित्यिकांनी आनंद व्यक्त केला आहे. अशोक कामत हे पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव अध्यासनाचे प्रमुख आणि राष्ट्रभाषा प्रचार समितीचेही सदस्य आहेत. त्यात ते पुण्याचेच असल्याने त्यांनी संमेलनाध्यक्ष म्हणून जोर लावण्याची तयारी सुरू केल्याचे कळले. तर डॉ. रवींद्र शोभणे संत नामदेव यांच्यावर नवी कादंबरी लिहित आहेत. याशिवाय ते स्वत: संत नामदेवांच्या वंशातीलच असल्याने त्यांनी संमेलनाध्यक्षपदासाठी आपल्यासारखा योग्य उमेदवार नाही, असे मत व्यक्त केले आहे. त्यांच्या पुस्तकांनी रौप्यमहोत्सवी आकडाही गाठला आहे. डॉ. शोभणेंच्या पाठीशी विदर्भ साहित्य संघही उभा राहू शकतो, अशी स्थिती आहे. याशिवाय सदानंद मोरे यांनीही संमेलनाध्यक्षपदासाठी इच्छा व्यक्त केल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे. यशवंत पाठक आणि रामचंद्र देखणेही या रिंगणात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. क ाय होणार, ते काळ सांगेलच.