शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

३० हजार शिक्षकांच्या नोकरीवर गंडांतर? आधार प्रमाणीकरणात अतिरिक्त ठरण्याची भीती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 07:42 IST

राज्य सरकारने गेल्या वर्षी शाळांना अनुदान मंजूर करताना विद्यार्थ्यांच्या आधार प्रमाणीकरणावर प्रत्येक शाळेची संचमान्यता मंजूर करण्यास सांगितले आहे.

जळगाव : विद्यार्थ्यांच्या आधार प्रमाणीकरणाचा शेवटचा टप्पा शिक्षण संस्थांसाठी अडचणीचा ठरत असून, राज्यातील ३० हजार शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती आहे. त्यामुळे आधारला पर्यायी व्यवस्था शिक्षण विभागाने स्वीकारावी, अशी मागणी संस्थाचालक करत आहेत. राज्याच्या आकडेवारीनुसार अजूनही ७,१०,६३२ विद्यार्थ्यांचे आधार मॅच झालेले नाही आणि ३,१८,९६६ विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाही. 

राज्य सरकारने गेल्या वर्षी शाळांना अनुदान मंजूर करताना विद्यार्थ्यांच्या आधार प्रमाणीकरणावर प्रत्येक शाळेची संचमान्यता मंजूर करण्यास सांगितले आहे. त्यासाठी १५ जून २०२३ अंतिम मुदत होती; पण आजही प्रमाणीकरणाचे १०० टक्के काम झालेले नाही. त्यामुळे अंतिम संचमान्यता निघालेल्या नाहीत. आधारनुसार विद्यार्थीसंख्या गृहित धरल्यास ३० हजारपेक्षा अधिक शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ कार्यकारिणीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत हा मुद्दा गाजला.

राज्य सरकार आधार प्रमाणीकरणाचा आग्रह धरत असल्याने २४ लाख विद्यार्थी संच मान्यतेच्या बाहेर जातील, त्या तुलनेत शिक्षक अतिरिक्त ठरतील. यामुळे नवीन शिक्षक भरतीदेखील अडचणीत येणार असल्याच्या मुद्द्याकडे काही पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले आहे. रिक्त असलेली चार ते पाच हजार पदे भरून त्यांना शाळांमध्ये तपासणी करायला पाठवा, अशीही मागणी होत आहे. 

अडचणी समजून घेणार तरी केव्हा... माजी मंत्री विजय नवल पाटील म्हणाले, की शाळा प्रवेशात आधारचा संबंध जोडू नका, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्ण पीठाने दिला आहे. आधार प्रमाणीकरणात अडचणी येत आहेत.  विद्यार्थ्यांचे फोटो नसतात, काहींच्या अंगठ्याचे ठसे उमटत नाहीत, पालकांकडे मोबाइल नसतात. ग्रामीण भागात लहान मुलांचे आधार जन्मल्याबरोबर निघत नाही. त्यामुळे शिक्षकांना अडचणी येतात.

राज्यात आधारची स्थितीआधारनुसार विद्यार्थी    २,०८,७३,६६८आधार नसलेले विद्यार्थी    ३,१८,९६६अवैध आधार    ८,९५,६३७मिसमॅच आधार    ७,१०,६३२वैध आधार %    ९०.९२

शिक्षण विभागात ७० टक्के पदे रिक्त आहेत, ती भरावीत. विद्यार्थ्यांची शहानिशा करून त्यांची संख्या ठरवा.     - विजय नवल पाटील, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ

टॅग्स :Teacherशिक्षक