शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

'चड्डी- बनियन गँग' उल्लेखावरून गोंधळ; आदित्य ठाकरे, नीलेश राणेंमध्ये जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 09:50 IST

आदित्य ठाकरे यांनी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या कॅन्टीन कर्मचाऱ्याला केलेल्या कथित मारहाणीच्या घटनेचा आणि मंत्री संजय शिरसाट यांच्या व्हायरल व्हिडिओचा उल्लेख करत नाव न घेता त्यांचा अप्रत्यक्षपणे 'चड्डी-बनियन गँग' असा उल्लेख केला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्यात सोमवारी विधानसभेत उद्धव सेनेचे आमदार आदित्य ठाकरे आणि शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे यांच्यात 'चड्डी बनियन गँग' या वक्तव्यावरून खडाजंगी झाली.

नियम २९३ अंतर्गत प्रस्तावावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या कॅन्टीन कर्मचाऱ्याला केलेल्या कथित मारहाणीच्या घटनेचा आणि मंत्री संजय शिरसाट यांच्या व्हायरल व्हिडिओचा उल्लेख करत नाव न घेता त्यांचा अप्रत्यक्षपणे 'चड्डी-बनियन गँग' असा उल्लेख केला. तसेच "या गँगमधील लोक मारहाण करतात. युती धर्मामुळे मुख्यमंत्र्यांना गँग विरोधात कारवाई करता येत नाही, असा चिमटा काढला.

त्यावर निलेश राणे यांनी आक्रमक होत आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. नेमकी चड्डी कोण आणि बनियन कोण, हे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट सांगावे. त्यांना नाव घ्यायला भीती वाटत असेल तर सभागृहात असे शब्द वापरू नयेत. हिंमत असेल तर  नाव त्यांनी घ्यावे. नाहीतर ते शब्द सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकावे. बघूया त्यांच्यात किती हिंमत आहे, असे आव्हान राणे यांनी दिले. उद्धव सेनेचे आमदार यावेळी आक्रमक होण्याच्या तयारीत असतानाच भास्कर जाधव यांनी त्यांना शांत बसायची खूण केली.  

मंत्री सुरक्षित नाहीत, एसआयटी चौकशी करामुंबई :  सरकारने जनसुरक्षा विधेयक आणले. परंतु, राज्यात जनतेच्या नव्हे मंत्र्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला. मंत्री घरात सुरक्षित नाहीत. त्यांच्या व्हायरल व्हिडीओमध्ये पैशांची बॅग दिसते. हे मंत्री जाहीर कार्यक्रमात पैसे कमी पडले तर आम्ही देऊ, असे सांगतात. त्यामुळे त्यांची एसआयटी चौकशी करा, अशी खोचक टीका उद्धवसेनेचे आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत केली.आमदार परब यांनी राज्यात चड्डी, बनियन गँग किंवा चड्डी, टॉवेल गँगचे व्हिडीओ फिरत आहेत, अशी टीका शिंदेसेनेचे मंत्री संजय शिरसाट व आमदार संजय गायकवाड यांचे नाव न घेता केली. या मंत्र्यांना कपडे द्या, असा टोलाही लगावला. 

टॅग्स :Nilesh Raneनिलेश राणे Aaditya Thackerayआदित्य ठाकरेvidhan sabhaविधानसभा