शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
3
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
4
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
5
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
6
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
7
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
8
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
9
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
11
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
12
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
13
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
14
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
15
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
16
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
17
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
18
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
19
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
Daily Top 2Weekly Top 5

पवनऊर्जा प्रकल्पांचे करार रखडले

By admin | Updated: September 8, 2015 01:02 IST

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात उभारलेल्या आणि वीज खरेदी सुरू असलेल्या पवनऊर्जा प्रकल्पांच्या गुंतवणूकदार कंपन्यांबरोबर करार करण्यास राज्यातील भाजपा-शिवसेना

- यदु जोशी,  मुंबईकाँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात उभारलेल्या आणि वीज खरेदी सुरू असलेल्या पवनऊर्जा प्रकल्पांच्या गुंतवणूकदार कंपन्यांबरोबर करार करण्यास राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांची बिले रखडली आहेत. दहा महिने झाले तरी ३५७ मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्पांचे करार करणे बाकी आहेत. करार न झाल्याने या पवनऊर्जा उत्पादकांची बिले थकली आहेत. ही थकबाकी आता कोट्यवधी रुपयांपर्यंत गेली आहे. परिणामी, राज्यातील सुमारे २५०० कोटींची गुंतवणूक धोक्यात आहे. वर्षभरात राज्यात एकही नवीन प्रकल्प आला नाही. महाराष्ट्रात पवनऊर्जेच्या प्रकल्पात झालेल्या गुंतवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक आहे. सर्वच गुंतवणूकदारांनी बँकांकडून कर्ज काढले आहे.बिल मिळत नसल्याने बँकांचे हप्ते भरले जात नाहीत. त्यामुळे व्याजाचा आकडा दररोज वाढतो आहे. येत्या ३० सप्टेंबरपर्यंत हप्ते सुरळीत करण्यासाठी अनेक गुंतवणूकदारांना बँकांकडून सांगण्यात आले आहे. एक खिडकी धोरण नसल्याने गोंधळ- राज्यातील अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील ऊर्जानिर्मिती प्रकल्पांच्या अर्जांची छाननी, मूलभूत सुविधांसाठी ना हरकत प्रमाणपत्र व परवानगी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाकडून (मेडा) दिली जाते. त्यानंतर कंपन्यांनी निर्मिती केलेली वीज खरेदी महावितरण कंपनीकडून केली जाते. तर, वीज खरेदीचे करार एमएसडीसीएलबरोबर करायचे. त्यासाठी अपारंपरिक ऊर्जा विभागाकडून मान्यता देण्यात येते. अशा पद्धतीने एका प्रकल्पाला अनेक विभागांकडून विविध परवानग्या घ्यावा लागतात. राज्यात एक खिडकी योजनेद्वारे प्रकल्पांना मंजुरी मिळत नाही. उद्योगांची महाराष्ट्राकडे पाठ ! महाराष्ट्रात ६००० मेगावॅट इतकी पवनऊर्जेची निर्मिती क्षमता आहे. आतापर्यंत ४३८२ मेगावॅटची निर्मिती झाली आहे. त्यातील करार न झालेली ३५७ मेगावॅट ऊर्जा निर्मितीचे प्रकल्प आहेत. त्यासाठीची २५०० कोटी ही आतापर्यंतची सर्वाधिक मोठी गुंतवणूक आहे.मात्र करारांसाठी महिनोंमहिने वाट पाहावी लागत असल्याने गुंतवणूकदारांमध्ये नाराजी आहे. नवे गुंतवणूकदार इतर राज्यांकडे वळत आहेत.