शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संविधान हे देशातील रक्तविरहित क्रांतीचे शस्त्र; सरन्यायाधीश गवई यांचा महाराष्ट्र विधिमंडळातर्फे सत्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 05:37 IST

महाराष्ट्र विधानमंडळाकडून झालेला सत्कार हे राज्यातील १२.८७ कोटी जनतेचे आशीर्वाद असल्याचे सांगत त्यांनी आपले वडील माजी राज्यपाल स्व. रा. सू. गवई यांच्या विधिमंडळातील आठवणींनाही उजाळा दिला.

मुंबई : व्यक्तींना पदे मिळतात ती सत्ता नसते, संविधानिक पदावर व्यक्ती जातो तेव्हा त्यालाही घटनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार काम करणे अभिप्रेत असते. आपल्या देशाची राज्यघटना ही या देशात रक्तविरहित क्रांती निर्माण करण्याचे शस्त्र आहे, अशा शब्दांत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी संविधानाचे महत्त्व विशद केले.

सरन्यायाधीश गवई यांचा विधिमंडळातर्फे विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात सत्कार मंगळवारी करण्यात आला. यावेळी ‘भारताची राज्यघटना’ या विषयावर त्यांचे भाषण झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, उपसभापती नीलम गोऱ्हे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, तसेच दोन्ही सभागृहातील सर्व पक्षांचे गटनेते, प्रतोद उपस्थित होते.

‘हे राज्यातील १२.८७ कोटी जनतेचे आशीर्वाद’सरन्यायाधीश गवई म्हणाले, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय व समता हे मूल्य जपण्यात कार्यपालिका, विधिमंडळ आणि न्यायपालिका या तीनही स्तंभांना यश आले आहे. संविधानाच्या ७५ व्या वर्षात सरन्यायाधीश होण्याचा योग आला, याचा मला अभिमान आहे. महाराष्ट्र विधानमंडळाकडून झालेला सत्कार हे राज्यातील १२.८७ कोटी जनतेचे आशीर्वाद असल्याचे सांगत त्यांनी आपले वडील माजी राज्यपाल स्व. रा. सू. गवई यांच्या विधिमंडळातील आठवणींनाही उजाळा दिला.

‘राजकीय लोकशाही अबाधित ठेवली’बाबासाहेबांनी स्पष्टपणे सांगितले होते की, संविधान केवळ केंद्राभिमुख किंवा संघराज्यवादी नाही. हे संविधान युद्धाच्या व शांततेच्या काळात देशाला एकत्र ठेवणारे आहे, याची आठवण सरन्यायाधीश गवई यांनी यावेळी करून दिली. अनेक वेळा सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांनी केलेल्या कायद्यांना मान्यता देताना किंवा बाद करताना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय लोकशाही अबाधित ठेवली असल्याचेही त्यांनी सांगितले.

कायद्यातून पाहिले व्यापक जनहित : फडणवीससरन्यायाधीश गवई यांचा गौरव करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अनेकदा लोक न्यायाधीश, सरन्यायाधीश झाले की, कोषात जातात, पण गवई कोषात गेले नाहीत, ते सगळ्यांसाठी उपलब्ध राहिले. कायद्यात व्यापक जनहित कसे बसवता येईल, असे निर्णय त्यांनी उच्च न्यायालयात असताना दिले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलम गोऱ्हे यांनी केले, तर राम शिंदे यांनी प्रास्ताविक केले, आभार राहुल नार्वेकर यांनी मानले. यावेळी एकनाथ शिंदे, अजित पवार, अंबादास दानवे यांचीही भाषणे झाली.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र