शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

डमी बसवून पास झालेले कॉन्स्टेबल ट्रेनिंगला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 03:30 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत डमी उमेदवार बसवून उत्तीर्ण झालेले दोघे कॉन्स्टेबल नाशिकच्या पोलीस अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. नांदेड येथील बनावट नोकरभरतीत अटक केलेल्या एका पोलीस अधिका-याच्या जबाबातून ही माहिती पुढे आली.

मुंबई :महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत डमी उमेदवार बसवून उत्तीर्ण झालेले दोघे कॉन्स्टेबल नाशिकच्या पोलीस अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. नांदेड येथील बनावट नोकरभरतीत अटक केलेल्या एका पोलीस अधिका-याच्या जबाबातून ही माहिती पुढे आली.धनंजय रामभाऊ फरतडे (बक्कल क्रमांक १३६८) व नरेंद्र नारायणराव नाईक (क्रमांक २०७६) हे दोघे नागपूर ग्रामीण पोलीस दलात उपनिरीक्षक म्हणून भरती झाले आहेत. १५ दिवसांपासून ते प्रशिक्षण घेत आहेत. दोन वर्षांपूर्वी मांडवी (नांदेड) येथे स्पर्धा परीक्षेमध्ये डमी उमेदवार बसविणे, खोटे दस्तऐवज तयार करणा-यांचे रॅकेट उघडकीस आले होते. राज्य गुन्हा अन्वेषण विभागाने (सीआयडी) अटक केलेल्या साहाय्यक निरीक्षक सोमनाथ पारवे-पाटील याने घोटाळ््याची कबुली दिली. २०१६ च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ८२८ उमेदवारांचे ५ जानेवारीपासून नाशिकला ९ महिन्यांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. त्यात फरतडे व नाईक सहभागी झाले आहेत. सीआयडीचे तपास पथक त्यांची चौकशी करणार आहेत.भरतीचे रॅकेट-मांडवी येथे प्रफुल्ल राठोड याने एक संस्था स्थापन करुन डमी उमेदवार पुरविले होते. तो तरुणांकडून लाखो रुपये उकळीत होता. नागपूरचे साहाय्यक निरीक्षक सोमनाथ पारवे-पाटील, सोलस्कर यांच्यासह अन्य एक अधिकारी डमी उमेदवार म्हणून परीक्षा द्यायचे. या टोळीच्या मदतीने अनेक उमेदवार उत्तीर्ण झाल्याचे तपासातून पुढे आले आहे.

टॅग्स :NandedनांदेडPoliceपोलिस