मुंबई : एसआरए भूखंड गैरव्यवहारप्रकरणी मुंबईचे माजी जिल्हाधिकारी विश्वास पाटील व त्यांची पत्नी चंद्रसेना पाटील यांच्यावर ९ आॅगस्टपर्यंत गुन्हा न नोंदविण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने गुरुवारी एसीबीला दिले. त्यामुळे पाटील दाम्पत्याला एका आठवड्याचा दिलासा मिळाला आहे. मालाड येथील एसआरए भूखंड गैरव्यवहारप्रकरणी २४ जुलै रोजी विशेष एसीबीे न्यायालयाने पाटील दाम्पत्यावर गुन्हा नोंदविण्याचे आदेश एसीबीला दिले होते. त्याच्या वैधतेला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
विश्वास पाटील यांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 04:10 IST