शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
3
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
4
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
5
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
6
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
7
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
8
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
10
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
12
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
13
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
14
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
15
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
16
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
17
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
18
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
19
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
20
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा

धर्मा पाटील यांच्या कुटुंबियांचे निलम गो-हे यांच्याकडून सांत्वन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2018 20:02 IST

जानेवारी प्रकल्पात गेलेल्या जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्याने, हतबल झालेल्या धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता

मुंबई : जानेवारी प्रकल्पात गेलेल्या जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्याने, हतबल झालेल्या धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांना जे जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यातच त्यांचा काल दुर्दैवी मृत्यू झाला. या सदर कुटुंबाचं सांत्वन करण्याकरिता नीलमताई गोर्हे यांनीआज जे. जे. हॉस्पिटल, मुंबई येथे जाऊन भेट घेतली व त्यांना शिवसेना पक्षाच्या वतीने आधार दिला. यावेळी धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील, हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, ग्रामस्थ विशाल सुर्यवंशी, पाटील कुटुंबियांशी चर्चा केली. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यटन मंत्री श्री जयकुमार रावल व पाटील कुटुंबीय उपस्थित होते. मंत्रीमहोदय आणि पाटील कुटुंबाशी चर्चा केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना निलम हे ‌म्हणाल्या,"ऑक्टोबर २०१२ मध्ये केलेल्या पंचनाम्यानुसार भरपाई मिळावी अशी मागणी पाटील कुटुंबायांची आहे.

तत्कालीन सरकारकडून त्यांना  नुकसान भरपाई देण्यात आली होती ती बळजबरीने लादण्यात आली होती. त्याविरोधात त्यांनी महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागितली होती पण त्याची दखल घेतली गेली नाही. हा भूसंपादन प्रस्ताव ७/२००९ क्र.असून ८/५/२००९ला प्रस्ताव दाखल झाला व तो  २६/२/२०१४ ला अंतीम अधीसूचना निघाली. विशेष म्हणजे महाजेनकोने खाजगी वाटाघाटीने घेतलेल्या जमिनी ६७५ हेक्टर ३२ आर, तर भूसंपादनामार्फत संपादित जमिनी १९९ हेक्टर २७ आर आहेत. महाजेनकोने खाजगी वाटाघाटीने जमिनी संपादित करतांना मनमानी कारभार करून शेतकर्यांशी संवेदनाहीन वर्तन केले म्हणून त्यांच्याही तत्कालीन अधिकार्यांच्या चौकशीची व त्यांच्यावर कारवाईची मागणी आ.डाँ.नीलम गोर्हे यांनी केली आहे.                               आज दि.२८ जाने २०१८ला जेजे हॉस्पिटल येथे सुधारित नुकसान भरपाईबाबत पहाणीचे पत्र चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून पाटील कुटुंबियांना देण्यात आले आहे. असे असले तरी या व इतर ज्या ज्या शेतकर्यांच्या मोबदल्याबाबत तक्रारी आहेत त्या सर्व तक्रारींचे निराकरण महसूल, ऊर्जा या विभागांनी करावे असेही आ.डाँ. नीलम गोर्हे यांनी सरकारला सुचविले आहे व अधीवेशनातही त्याचा पाठपुरावा करणार आहेत