शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
3
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
4
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
5
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
8
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
9
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
10
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
11
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
12
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
13
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
14
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
15
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
16
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
17
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
18
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
19
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
20
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!

राज्याच्या विकासाची गती लक्षात घेऊन महापारेषणने २०३० पर्यंतचे नियोजन करावे - चंद्रशेखर बावनकुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 19:21 IST

भविष्यात राज्याचा व प्रामुख्याने मुंबईचा होणारा विकास लक्षात घेऊन महापारेषणने किमान २०३० पर्यंतचे पुढील नियोजन करावे व त्याबाबतचा आराखडा लवकरात-लवकर सादर करावा, असे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

मुंबई : भविष्यात राज्याचा व प्रामुख्याने मुंबईचा होणारा विकास लक्षात घेऊन महापारेषणने किमान २०३० पर्यंतचे पुढील नियोजन करावे व त्याबाबतचा आराखडा लवकरात-लवकर सादर करावा, असे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. महापारेषणच्या राज्य भार प्रेषण केंद्र, कळवा येथे आयोजिलेल्या आढावा बैठकीत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते.  सुरवातीला ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य भार प्रेषण केंद्राच्या सर्व्हर रुम व कंट्रोल रुमची पाहणी केली. यावेळी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या. त्यानंतर मुख्य अभियंता अनिल कोलप यांनी महापारेषणच्या कामकाजाचे सादरीकरण केले. पारेषण केलेली वीज, आकस्मिक घटना, अंदाजपत्रक, वीजनिर्मितीचा आढावा, नियोजित प्रकल्प, महापारेषणची आंतरवाहिनी, मुंबई आयलॅडिंग योजनेचे भारनियमन याबाबत सादरीकरण केले.   ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ``राज्यास अखंड वीजपुरवठा करण्याच्या दृष्टीने वाढती विजेची मागणी लक्षात घेता महापारेषण अंतर्गत येणाऱ्या राज्य भार प्रेषण केंद्रांचे बळकटीकरण करण्यात येईल, याकरिता आवश्यक निधीची कमतरता पडू देणार नाही. पण, महापारेषणने जगातील सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान वापरून राज्याची विजेची गरज पूर्ण करावी.`` सायबर हल्ल्याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी तसेच राज्य भार प्रेषण केंद्रांतील त्रुटी दूर करण्याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश दिले. याप्रसंगी महापारेषणचे संचालक (प्रकल्प)  रवींद्र चव्हाण, संचालक (संचलन) गणपत मुंडे, संचालक (महिला) श्रीमती पुष्पा चव्हाण, ऊर्जा विभागाचे उपसचिव भीमाशंकर मंता, मुख्य अभियंता श्रीराम भोपळे,  शशांक जेवळीकर, श्रीमती ज्योती चिमटे, मोतीसिंह चौहान,  सतीश गहेरवार यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे