शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
6
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
7
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
8
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
9
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
10
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
11
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
12
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
13
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
14
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
15
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
16
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
17
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
18
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
19
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
20
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात

शासनाची ४० कोटीच्या फसवणूकीप्रकरणी चौघा पोलिसांसह बिल्डराविरुद्ध गुन्हा दाखल

By admin | Updated: June 11, 2017 20:08 IST

खोटे प्रतिज्ञापत्र व कागदपत्राद्वारे गृहनिर्माण सोसायटीची स्थापना करुन शासन व म्हाडाची सुमारे ४० कोटीची फसवणूक केल्याप्रकरणी

 जमीर काझी/ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 11 - खोटे प्रतिज्ञापत्र व कागदपत्राद्वारे गृहनिर्माण सोसायटीची स्थापना करुन शासन व म्हाडाची सुमारे ४० कोटीची फसवणूक केल्याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात सोसायटीच्या माजी पदाधिकाऱ्यासह सहाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये एका सहाय्यक पोलीस आयुक्त, माजी पोलीस निरीक्षक आणि प्रत्येकी दोन हवालदार व बांधकाम व्यावसायिकांचा समावेश आहे. रेल्वे पोलिसातील सहाय्यक आयुक्त सुरेश परब, निवृत्त निरीक्षक अनिल जैतापकर,हवालदार सुरेश शिंदे, हवालदार वल्लभ पांगे,बायोबिल्ड डेव्हलपर्स कंपनीचे आनंद पाटील व सय्यद शमशुद्दीन अशी त्यांची नावे आहेत. शिंदे व पागे हे मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. मुंबईत स्वत:च्या नावावर घर असतानाही खोटे शपथपत्राच्या आधारे म्हाडाकडून रास्तभावाने भुखंड घेवून टॉवर उभारला, त्याचप्रमाणे शासन व म्हाडाच्या २० टक्के घरांची परस्पर विक्री करुन हाअपहार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर म्हाडाने चौकशी करीत या गैरव्यवहाराबाबत ही कारवाई केली आहे. २००३ ते २०१३ या कालावधीत हा अपहार करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.जैतापकर हे विधान भवना सुरक्षा अधिकारी असताना त्यांनी म्हाडा अधिनियम १९९८२ विनियम १६ अंतर्गत भूखंड घेत टिळकनगरात महालक्ष्मी हौसिंग को-आॅपरेटिव्ह सोसायटी बांधली आहे. त्या कार्यकारिणीमध्ये परब हे सचिव तर हवालदार शिंदे व पांगे हे सदस्य आहेत. मात्र त्यांनी त्यापूर्वी मुख्यमंत्री कोट्यातून मुलूंड येथे फ्लॅट घेतल्याचे,त्याचप्रमाणे सभासदाच्या सदनिकांची आदलाबदल करणे, शासन व म्हाडासाठी देय असलेल्या २० टक्के फ्लॅट, दुकाने व शेअर्सची परस्पर विक्री आणि अनाधिकृतपणे व्यायामशाळा सुरु करुन शासन व म्हाडाची कोट्यावधीची फसवणूक केल्याबाबतची जनहित याचिका युवराज सावंत यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यानंतर कोर्टाच्य निर्देशानंतर म्हाडाने याप्रकरणाची चौकशी करुन पोलिसांकडे तक्रार केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सुनिल काळे करीत आहेत. आठवड्यापूर्वी कोट्यावधीचा फ्लॅट सीलफसवणूकीप्रकरणी अनिल जैतापकर यांचा महालक्ष्मी को-आॅपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीतील पाचव्या मजल्यावरील ५०३ क्रमांकाचा अकराशे चौरस फुटाचा फ्लॅट गेल्या सोमवारी म्हाडाने जप्त केला आहे. याप्रकरणी शुल्क भरुन घेवून सदनिकेचे नियमितीकरण करण्यात यावे,अशी विनंती जैतापकर यांनी गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांच्या शिफारशीनिशी केली होती. मात्र नियमात बसत नसल्याने आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होण्याच्या शक्यतेने मुख्यमंत्र्यांनी ती विनंती फेटाळल्यानंतर ५ जूनला म्हाडाने पोलीस बंदोबस्तात हा फ्लॅट सील केला. सहा महिन्यानंतर गुन्हा दाखलम्हाडाने फसवणूक व अफरातफर प्रकरणी जैतापकर यांच्यासह सोसायटीच्या माजी पदाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याबाबत गेल्यावर्षी १६ डिसेंबरला सर्व दस्ताऐवजासह टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. मात्र सरकारी पक्ष फिर्यादी असूनही अधिकाऱ्यांनी अर्जाबाबत विविध ‘अर्थ’ काढीत तब्बल सहा महिने प्रकरण प्रलंबित ठेवले होते. अखेर त्याबाबतचा प्रस्ताव परिमंडळ-६ उपायुक्त शहाजी उमाप व अप्पर आयुक्त लख्मी गौतम यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.त्यामुळे अखेर ८ जूनला रात्री उशिर गुन्हा दाखल करण्यात आला.  म्हाडाने दिलेला अहवाल व पोलिसांची कारवाई चुकीची आहे.आम्ही न्यायालयाद्वारे प्रत्यूत्तर देवू. कोर्टाचा जो निकाल असेल तो आम्हाला मान्य असेल.- अनिल जैतापकर ( निवृत्त पोलीस निरीक्षक व माजी चेअरमन, महालक्ष्मी गृहनिर्माण सोसायटी,चेंबूर)