शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
2
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
3
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
4
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
5
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
6
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
7
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
8
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
9
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
10
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
11
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
12
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
13
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
14
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
15
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
16
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
17
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
18
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
19
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
20
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...

विजयदुर्ग कोल्हापूरशी जोडणार

By admin | Updated: August 21, 2016 00:31 IST

सुरेश प्रभंूची घोषणा : आचिर्णे स्थानकाचे भूमिपूजन; सिंधुदुर्गमध्ये लवकरच पर्यटन बैठक

तळवडे (ता. सावंतवाडी) : कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाला विजयदुर्ग बंदराने जोडणार असून, याबाबत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. ते सावंतवाडी येथे टर्मिनसच्या दुसऱ्या टप्प्याचे तसेच आचिर्णे रेल्वे स्थानकाच्या भूमिपूजनप्रसंगी बोलत होते. यावेळी त्यांनी सिंधुदुर्गमध्ये लवकरच पर्यटनाची बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले.कार्यक्रमाला सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, माजी आमदार राजन तेली, जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, सावंतवाडी नगराध्यक्ष बबन साळगावकर, सभापती प्रमोद सावंत, मळगाव सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर, रेल्वे संचालक संजय गुप्ता, आयआरटीसीचे अध्यक्ष डॉ. ए. के. मनोचा, बिशप आॅल्विन बरॅटो, बाळासाहेब निकम, प्रभाकर सावंत, रूपेश राऊळ, आदी उपस्थित होते.मळगाव येथे रेल्वे हॉटेल बनविणार असून, त्याचा प्रकल्प अहवालही तयार करण्यात आला आहे. याबाबत टाटा कंपनीशी चर्चा सुरू आहे. हे हॉटेलही लवकर बनविण्यात येईल, असे त्यांनी जाहीर करून, सिंधुदुर्गची प्रगती पर्यटनातूनच करावी लागेल, यासाठी लवकरच केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री महेश शर्मा यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्गमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यात देशातील पर्यटन क्षेत्रातील महत्त्वाच्या लोकांना बोलाविण्यात येणार आहे, असेही मंत्री प्रभू यांनी यावेळी स्पष्ट केले.यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, कोकण रेल्वेचे संचालक संजय गुप्ता, डॉ. ए. के. मनोचा, आदींची भाषणे झाली. बाळासाहेब निकम यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते आर्चिर्णे रेल्वे स्थानकाचे रिमोटद्वारे, तर सावंतवाडी टर्मिनसच्या दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन यावेळी पार पडले. (प्रतिनिधी)कोकण समृद्ध बनविण्याचे माझे स्वप्नकोकण रेल्वेमार्गावरचा जास्तीत जास्त विकास करण्यात येणार असून, पूर्वी जे झाले नाही, ते या पाच वर्षांत करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग कोणत्याही क्षेत्रात मागे राहणार नाही, याची काळजी कोकणचा सुपुत्र म्हणून मी घेणार आहे, असे सांगत जास्तीत जास्त विकास करून समृद्ध कोकण बनवायचा आहे. हे माझे स्वप्न असून, ते पूर्ण करणारच, असेही त्यांनी यावेळी सांगितले. पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले, मळगाव रेल्वे स्थानकात रेल्वे हॉटेल बनविण्यासाठी महाराष्ट्र सरकार तीन कोटी रुपयांचा निधी देणार आहे. मात्र, रेल्वे संयुक्तरीत्या हा प्रकल्प करीत असेल, तर राज्य सरकार सर्व ती मदत करेल, असेही त्यांनी जाहीर केले.लवकरच सर्वेक्षण करणाररेल्वेमंत्री सुरेश प्रभू म्हणाले, यापूर्वी उद्घाटन झाले की दगड लपवावे लागत होते; पण आता परिस्थिती बदलली असून, उद्घाटन झालेले दगड जपून ठेवावे लागत आहेत. काळ बदलला असून, कामांना गती आली आहे. यापूर्वी कोल्हापूर वैभववाडीशी जोडण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता; पण आता कोल्हापूर विजयदुर्ग बंदराशी जोडण्यात येणार आहे. त्याचे लवकरच सर्वेक्षण करण्यात येणार आहे.बेळगाव-रेडी बंदर रेल्वेने जोडातत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी बेळगाव-सावंतवाडी रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, बेळगाव रेडी बंदराशी जोडले गेले तर आणखी जलदगतीने विकास होईल. या मार्गाचे लवकरात लवकर सर्वेक्षण केले जावे, अशी मागणी राज्याचे गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी प्रभू यांच्याकडे यावेळी केली.