शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मोदी यांना रोखणे हेच कॉंग्रेसचे टार्गेट :पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 18:47 IST

एकापाठोपाठ एक लोकशाही संस्था उध्वस्त करणाऱ्या नरेंद्र मोदी यांना रोखणे हा आमच्या सर्व विरोधी पक्षांचा एकमेव अजेंडा आहे. यामध्ये पक्षीय मतभेद न आणता तडजोडीची भूमिका सर्वच विरोधी पक्षांनी घेतली असल्याची वस्तुस्थिती माजी मुखयमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली.

ठळक मुद्देमोदी यांना रोखणे हेच कॉंग्रेसचे टार्गेट :पृथ्वीराज चव्हाण‘लोकमत’ कोल्हापूर  कार्यालयामध्ये दिलखुलास गप्पा

कोल्हापूर  : एकापाठोपाठ एक लोकशाही संस्था उध्वस्त करणाऱ्या नरेंद्र मोदी यांना रोखणे हा आमच्या सर्व विरोधी पक्षांचा एकमेव अजेंडा आहे. यामध्ये पक्षीय मतभेद न आणता तडजोडीची भूमिका सर्वच विरोधी पक्षांनी घेतली असल्याची वस्तुस्थिती माजी मुखयमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली.

चव्हाण यांनी शनिवारी दुपारी ‘लोकमत’च्या शहर कार्यालयास सदिच्छा भेट देऊन देश आणि राज्यातील विविध प्रश्नांबाबत मनमोकळी चर्चा केली. संपादक वसंत भोसले यांनी स्वागत करून त्यांना विविध विषयांवर बोलते केले.देशपातळीवरील राजकारणाबाबत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, हिंदी भाषिक पटट्यामध्ये भाजपने गेल्या लोकसभेवेळी २७३ पैकी २२३ जागा मिळवल्या होत्या. परंतू याच पटट्यात आता आमची युपीए आघाडी मजबूत झाली आहे. त्यामुळे येथे भाजपच्या १00 ते ११0 जागा कमी होणार आहेत.

कर्नाटकात त्यांच्या १७ जागा आहेत त्या ५/६ पर्यंत खाली येतील. पुर्व भारतातील ७ जागा त्यांना टिकवता येणार नाहीत. महाराष्ट्र आणि गोव्याच्या एकूण ५0 जागा आहेत. मात्र शिवसेनेबाबत युती होणार की नाही हे जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत इथले चित्र सांगणे अवघड आहे.उत्तर प्रदेशमध्ये जरी सप, बसप युती झाली असली आणि आम्हांला पाऊल मागे घ्यावे लागले असले तरी तेथील वरच्या वर्गातील मते ही आम्ही निवडणूक नाही लढवली तर भाजपकडेच जाणार. ती जावू नयेत यासाठी आम्ही तेथे स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतल्याचे चव्हाण यांनी सांगितले. उपव्यवस्थापक (मनुष्यबळ आणि प्रशासन) संतोष साखरे, मुख्य बातमीदार विश्वास पाटील यांच्यासह संपादकीय सहकाऱ्यांनी चर्चेत भाग घेतला.

आरएसएसला हात झटकता येणार नाहीतआरएसएसने मोदी यांना आणले आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणूक जिंकणं सहज शक्य नाही याची जाणीव आरएसएसलाही झाली आहे. त्यामुळे चूक झाली हे तर आरएसएसने मान्य करावे किंवा मोदी जे करत आहेत ते बरोबर आहे असे जाहीर करावे. यापुढच्या काळात आम्हीच आरएसएसला याबाबत जाब विचारणार आहोत.

सांगलीतून मी लढणार नाहीसांगली लोकसभेसाठी माझ्या नावाची चर्चा सुरू आहे असे समजले. मात्र माझा पूर्वीचा मतदारसंघ आता राहिलेला नाही. त्यामुळे माझ्या नावाच्या चर्चेत अर्थ नाही. मी तेथून निवडणूक लढवणार नाही.

महाराष्ट्रामध्ये दुष्टपणाने सरकार चालवलं जातंयमहाराष्ट्रामध्ये अतिशय दुष्टपणाने सरकार चालवलं जात असल्याचा आरोप यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. त्यातही कोल्हापुरातून राज्याला एक देणगी मिळाली आहे. महसूल खात्यातील भ्रष्टाचार टोकाचा वाढला असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.

 

 

टॅग्स :congressकाँग्रेसkolhapurकोल्हापूरLokmatलोकमत