शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सरकारविरुद्ध काँग्रेसचा विभागीय जनआक्रोश मेळावा - माणिकराव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2017 19:34 IST

भाजप सरकारच्या गत तीन वर्षांतील अपयशाच्या वाटचालीमुळे शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, विद्यार्थी, महिला तसेच सर्व क्षेत्रातील नागरिकांमध्ये कमालीचा रोष निर्माण झाला आहे. हा रोष सरकारला दाखविण्यासाठी येत्या ७ नोव्हेंबर रोजी सांयन्सस्कोअर मैदानावर अमरावती विभागीय जनआक्रोश मेळावा काँग्रेसच्यावतीने आयोजित केल्याची

अमरावती -  भाजप सरकारच्या गत तीन वर्षांतील अपयशाच्या वाटचालीमुळे शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, विद्यार्थी, महिला तसेच सर्व क्षेत्रातील नागरिकांमध्ये कमालीचा रोष निर्माण झाला आहे. हा रोष सरकारला दाखविण्यासाठी येत्या ७ नोव्हेंबर रोजी सांयन्सस्कोअर मैदानावर अमरावती विभागीय जनआक्रोश मेळावा काँग्रेसच्यावतीने आयोजित केल्याची माहिती विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी रविवारी येथे दिली.या मेळाव्याला प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण, महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व अन्य नेते उपस्थित राहतील, असे ठाकरे यांनी आयोजित पत्रपरिषदेत सांगितले. केंद्रातील भाजप सरकारला सत्तेत येऊन ३१ आॅक्टोबर रोजी तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. या तीन वर्षांच्या कार्यकाळात भाजप सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे. शेतमालाला अल्प भाव, नापिकी, नैसर्गिक आपत्ती, शेतकºयांची कर्जमाफीच्या नावावर केलेली फसवणूक, जीएसटीमुळे नाराज असलेला व्यापारी वर्ग भाजप सरकारच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त करीत आहे. त्यामुळे जनसामान्यांना संकटातून सावरण्यासाठी विरोधी पक्ष काँग्रेसने ठाम उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप सरकारविरुद्ध वाढलेला जनआक्रोश शासनदरबारी मांडण्यासाठी काँग्रेसने अमरावतीत विभागीय जनआक्रोश मेळावा घेण्याचे ठरविले आहे. या मेळाव्यात शेतकºयांना सरसकट कर्जमाफी, कापसाला ७ हजार रूपये भाव, सोयाबीनला ५ हजार रूपये भाव व नुकसानभरपाई द्यावी, अशा मागण्या शासनाकडे या मेळाव्यातून केल्या जाणार असल्याचे ठाकरे म्हणाले. मेळाव्यात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी माजी मंत्री शिवाजीराव मोघे, वसंत पुरके, आ. वीरेंद्र जगताप, यशोमती ठाकूर, राहुल बोंद्रे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, शहराध्यक्ष किशोर बोरकर, श्याम उमाळकर, मदन भरगड, बंडू सावरबांधे, प्रदेश सरचिटणीस संजय खोडके, प्रकाश साबळे, नितीन गोंडाणे, केवलराम काळे व पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस