शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

Maharashtra Election 2019: राज्यात आघाडीच्या २४ जागाच येतील - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 06:34 IST

बंडखोराचे डिपॉझिट जप्त होण्याचा दावा Maharashtra Election 2019:

मुंबई : काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या या वेळी राज्यात एकूण २४ जागाच येतील, अशी भविष्यवाणी करून येत्या २४ तारखेला राज्यात महायुतीला घवघवीत यश मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्सोवा येथे रविवारी झालेल्या सभेत व्यक्त केला.आमची महायुती ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारी आहे. त्यामुळे बंडखोरी करणाऱ्या गद्दारला येथील जनता कदापि थारा देणार नाही. जनताच येथील बंडखोर उमेदवाराला त्याची जागा दाखवून देईल. बंडखोराचे डिपॉझिट जप्त होऊन पुन्हा भारती लव्हेकरच मोठ्या मताधिक्याने विजयी होतील,असा ठाम विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती लव्हेकर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची महाजनादेश संकल्प सभा येथील चित्रकूट मैदानात आयोजित केली होती. या सभेत मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी व शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. आमच्या समोर निस्तेज विरोधी पक्षाचे आव्हानच नाही, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

पाच वर्षांत महायुतीच्या सरकारने राज्यात नेत्रदीपक कामगिरी केली. आघाडीच्या सरकारच्या काळापेक्षा आमची कामे दुप्पट आहेत.मुंबईतील मेट्रोचे जाळे, ट्रान्स हार्बर, वांद्रे-वर्सोवा सी-लिंक, कोस्टल रोडया प्रकल्पांमुळे मुंबई अधिक गतिमानहोणार असून मुंबईकरांचे जीवन सुसह्य बनेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.या वेळी मंचावर मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, शिवसंग्रामचेराष्ट्रीय अध्यक्ष विनायक मेटे, भाजपराष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य रघुनाथ कुलकर्णी, भाजप प्रदेश सचिव संजयपांडे, उमेदवार डॉ. भारती लव्हेकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019