मणिपूरबाबत राहुल गांधींना दोषी ठरवण्याचा प्रयत्न, मोदींनी राजधर्म पाळावा; काँग्रेसने सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 03:14 PM2023-07-27T15:14:14+5:302023-07-27T15:14:49+5:30

Manipur Violence: राहुल गांधींवर करण्यात आलेल्या आरोपांवरून काँग्रेस आक्रमक झाली असून, मोदी सरकारवर टीका करण्यात येत आहे.

congress yashomati thakur criticized smriti irani over allegations on rahul gandhi over manipur violence | मणिपूरबाबत राहुल गांधींना दोषी ठरवण्याचा प्रयत्न, मोदींनी राजधर्म पाळावा; काँग्रेसने सुनावले

मणिपूरबाबत राहुल गांधींना दोषी ठरवण्याचा प्रयत्न, मोदींनी राजधर्म पाळावा; काँग्रेसने सुनावले

googlenewsNext

Manipur Violence: मणिपूरमधील हिंसाचारावरून सत्ताधारी मोदी सरकार आणि विरोधक आमनेसामने आल्याचे पाहायला मिळत आहे. मणिपूरमधील घटनेवरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. यातच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी याला राहुल गांधी जबाबदार असल्याचे विधान केले असून, यावरून आता विरोधकांनी भाजप आणि मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. राज्यातील काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी चोराच्या उलट्या बोंबा मारू नका, असे म्हणत स्मृती इराणी यांचा जाहीर निषेध केला आहे. 

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मीडियाशी बोलताना यशोमती ठाकूर आक्रमक झाल्या. महिला अत्याचाराच्या घटनांवर पक्षीय राजकारण करणाऱ्या स्मृती इराणी यांचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. मणिपूरच्या घटनेबाबत आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्मृती इराणी यांच्या मौनाबाबत प्रश्न विचारले. मणिपूर वर बोलणं टाळण्यासाठी आता भाजपने अतिशय खालच्या स्तरावर जाऊन राहुल गांधी यांना मणिपूर साठी जबाबदार धरण्याचा कांगावा सुरू केला आहे. काल महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी एखाद्या टीव्ही डिबेट किंवा पक्षाच्या सभेत असल्या सारख्या बोलल्या. त्यांचा राज्यसभेतील आवेश हा नळावरच्या भांडणासारखा होता, या शब्दांत यशोमती ठाकूर यांनी हल्लाबोल केला.

पंतप्रधान मोदींनी राजधर्म पाळला पाहिजे

मणिपूरच्या घटनेवर बोलायची संवेदनशीलता ही या सरकारमध्ये नाही. केंद्र सरकार संसदेत चर्चा करायला तयार नाही, या विषयावर राजकारण करायचं नाही अशी भूमिका राहुल गांधी यांनी घेतली होती, ईशान्येकडच्या राज्यांकडे विशेष लक्ष द्या असं राहुल गांधी नी सांगितलं होतं. मात्र सरकार आता राहुल गांधी यांना या बाबत दोषी ठरवण्याचा प्रयत्न करतयं. या चोराच्या उलट्या बोंबा आहेत, आणि आम्ही या वृत्तीचा निषेध करतो. पंतप्रधान मोदींनी राजधर्म पाळला पाहिजे. संघ परिवाराशी संबंधित इंडिक टेल ही प्रपोगंडा साइट आहे. या साइटची मालकी सरयू या एनजीओ कडे आहे. ही एनजीओ ही समाजात विष कालणारा मोडका इतिहास पसरवत असते, अशी घणाघाती टीका यशोमती ठाकूर यांनी केली. 

दरम्यान, संघ परिवाराशी संबंधित अनेक संस्था आता सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांच्याबद्दल दुष्प्रचार करणारे साहित्य पुस्तिका रूपाने काढून व्हायरल करत आहेत. काही सोशल मीडिया हँडल्स त्यांना इंग्रजांचे हस्तक म्हणून प्रचार करत आहेत. फुले दाम्पत्याचे सामाजिक कार्य आभाळाएवढे आहे, त्यांनी वंचित घटक आणि सर्व जाती-धर्मातील महिलांना सन्मान दिला. आम्ही केवळ या दाम्पत्यामुळे इथे आहोत. अशावेळी त्यांचे योगदान नाकारणारी जी काही टोळी महाराष्ट्रात निर्माण झाली आहे, त्याचा मुखिया संघपरिवारच कसा हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे छोट्या मोठ्या लोकांवर तुम्ही कारवाई कराच, पण यामागचे ब्रेन ही समोर आले पाहिजेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
 

Web Title: congress yashomati thakur criticized smriti irani over allegations on rahul gandhi over manipur violence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.