शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा, संजय राऊत यांच्या भूमिकेशी काँग्रेस सहमत; नेते म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 15:10 IST

Congress Vikas Thackeray News: आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याच्या ठाकरे गटाच्या निर्णयावर महाविकास आघाडीतून संमिश्र प्रतिक्रिया येत असल्याचे सांगितले जात आहे.

Congress Vikas Thackeray News: मुंबईसह नागपूरपर्यंत आम्ही स्वबाळवर लढू. काय होईल ते होईल. एकदा आम्हाला आजमवायचेच आहे. नागपूरलासुद्धा आम्ही स्वबळावर लढणार आहोत. उद्धव ठाकरेंनी तसे संकेत दिले आहेत. शिवसेना शहरप्रमुखांशी आम्ही चर्चा केली. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरबाबत आमचे ठरत आहे. कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही. त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो. महानगर पालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायतीमध्ये स्वबळावरुन लढून आपआपले पक्ष मजबूत करावेत, असे संजय राऊत म्हणाले. यानंतर आता महाविकास आघाडीतून संमिश्र प्रतिक्रिया येत असून, संजय राऊतांच्या भूमिकेचे काँग्रेसकडून स्वागत करण्यात आले आहे.

विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीत धुसफूस सुरु झाली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीसोबत लढणार नसल्याची माहिती समोर आली आहे. महापालिका निवडणुकांमध्ये आम्ही स्वबळावर लढणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले. मुंबई, ठाणे, नागपूर, पुण्यासह सगळीकडे स्वबाळवर लढणार असल्याचे संजय राऊत म्हणाले. एकदा आम्हाला आजमवून पाहायचे आहे, असा आक्रमक पवित्रा संजय राऊत यांनी घेतला आहे. यावर काँग्रेस नेते विकास ठाकरे यांनी भाष्य केले.

संजय राऊत यांच्या भूमिकेशी काँग्रेस सहमत; विकास ठाकरे काय म्हणाले?

पक्ष वाढीच्या संदर्भात त्यांचे जे विचार आहेत ते योग्यच आहे. कारण कार्यकर्त्यांची एक प्रकारे ओरड असते की, आम्हाला संधी मिळत नाही. यामुळे स्वबळावर लढल्यास बरे होईल. नागपूर जिल्ह्याचा काँग्रेसचा अध्यक्ष या नात्याने माझे वैयक्तिक मत व्यक्त केले आहे. नागपूर शहराचा महापौर म्हणूनही काम केले आहे. अनेक वर्षापासून संघटनेचे काम करत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचे जे मत आहे ते वैयक्तिकरित्या आपल्यासमोर मांडले आहे, असे काँग्रेस नेते विकास ठाकरे म्हणाले.

दरम्यान, मनपा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचा निर्णय जर हा महाविकास आघाडीचा असेल तर तो सर्वांना मान्य असेल. परंतु, नागपूरमध्ये तरी काँग्रेस हा पक्ष सर्व निवडणुका स्वबळावर लढत आला आहे. काँग्रेस पक्षाला प्रत्येक बुथवर चांगले मतदान होत आले आहे. संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर कुठली हरकत नाही. कार्यकर्त्यांबाबत संधी मिळत नसल्याच्या  वक्तव्यावर सहमत आहे. ती खरी गोष्ट असून पक्ष वाढीसाठी या निवडणुका स्वबळावरच लढल्या पाहिजेत, असे विकास ठाकरे म्हणाले. 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीVikas Thackreyविकास ठाकरेVikas Thakreविकास ठाकरेcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊत