शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

“पुणे घटनेची जबाबदारी स्वीकारावी, सरकार सत्तेत दंग, महिलांची चिंता नाही”: विजय वडेट्टीवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 14:05 IST

Congress Vijay Wadettiwar News: पुण्यातील या घटनेचा मुद्दा आम्ही विधानसभा अधिवेशनात लावून धरू, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

Congress Vijay Wadettiwar News: विद्येचे आणि संस्कृतीचे माहेरघर असा लौकिक असलेल्या पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकात शिवशाही बसमध्ये २६ वर्षाच्या तरुणीवर एका नराधमाने अमानुष अत्याचार केला. मंगळवारी पहाटे घडलेल्या या पाशवी घटनेने लाडक्या बहिणींच्या सुरक्षेची लक्तरे वेशीवर टांगली गेल्याने पुणे हादरले असून, राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. यावरून राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

पत्रकारांशी बोलताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली. स्वारगेट बस स्थानकात झालेली घटनेची जबाबदारी सरकार आणि एसटीने स्वीकारली पाहिजे. घटना घडली तेव्हा तिथे असलेली यंत्रणा काय करत होती. रिकाम्या बसमध्ये जे काही मिळाले आहे, ते धक्कादायक आहे. त्या ठिकाणी चार रिकाम्या बस महिलांच्या शोषणसाठी वापरल्या जात होत्या का? असा प्रश्न निर्माण होतो. गृह विभागाची इभ्रत रोज चालली आहे, ती वेशीवर टाकल्यासारखी स्थिती झाली आहे. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. 

सरकार सत्तेत दंग, महिलांची चिंता नाही

सरकार सत्तेत दंग आहे. सरकारला महिलांची चिंता नाही. पुण्यातील या घटनेचा मुद्दा आम्ही विधानसभा अधिवेशनात मांडू. गृह विभागाचा आणि कायद्याचा धाक राहिला आहे की नाही असा प्रश्न निर्माण होतो, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. पुणे शिक्षणाचे माहेरघर, सांस्कृतिक नगरी असली, तरी मुलींच्या बाबतीत अत्यंत धोक्याचे शहर झाले आहे. महाराष्ट्र शक्ती कायद्याची कठोर अंमलबजावणी त्वरित व्हावी आणि कायद्याचा धाक दिसावा, अशी अपेक्षा वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. 

दरम्यान, अशा घटना वारंवार घडत आहेत. सरकार या घटनांवर गंभीर आहे की नाही? हा प्रश्न उपस्थित होतो. फक्त म्हणत आहेत की, आम्ही कारवाई करू. आम्ही अटक करू. परंतु ते काही करत नाहीत. महिलांच्या शोषणामध्ये वाढ होत चालली आहे, या शब्दांत वडेट्टीवार यांनी निशाणा साधला.

 

टॅग्स :congressकाँग्रेसPuneपुणेVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार