शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 13:27 IST

Congress Vijay Wadettiwar: सरकारने SIT नेमली तरी ते पुरेस नाही. विदर्भ आणि मराठवाडा जिल्ह्यात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचे नेतृत्वाखाली टीम करून हे रॅकेट पकडले पाहिजे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.

Congress Vijay Wadettiwar: चंद्रपूर येथील शेतकरी रोशन कुडे यांनी सावकाराकडून फक्त एक लाख घेतले होते, पण त्यावरील व्याज वाढून ते ७४ लाख झाले. त्याची किडनी विकण्यात आली. असे शेतकऱ्यांना धमकावून किडनी विकणारे मोठे रॅकेट महाराष्ट्रात सक्रिय असून याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

सरकारने आज SIT नेमली तरी ते पुरेस नाही. शेतकऱ्यांना त्रास देऊन पैसे लुबाडणारे सावकारांचे रॅकेट आहे. विदर्भ आणि मराठवाडा जिल्ह्यात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचे नेतृत्वाखाली टीम करून हे रॅकेट पकडले पाहिजे. राज्यात शेतकऱ्यांना किडनी विकण्याची वेळ महायुती सरकारने आणली. हे सरकार शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. किडनी विकणारे रॅकेट सोशल मीडियाच्या माध्यमातून ही सक्रिय असू शकते. यात डॉक्टर, एजंट असू शकतात याची चौकशी झाली पाहिजे, जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

निवडणूक आयोग भाजपची बी टीम असल्याचा आरोप

राज्यात नगरपरिषदेचे मतदान होत असले तरी अनेक ठिकाणी पैशाचे आमिष मतदारांना दाखवण्यात आल्याचा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. निवडणूक आयोग हा भाजपाची बी टीम म्हणून काम करत आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. निवडणुकीत पाच हजार रुपयाची पाकीट वाटण्यात आली तर त्र्यंबकेश्वर येथील निवडणुकीत ५० हजार रुपये एका मताला देण्यात आले, कारण कुंभ येत आहे तिथे सत्ता हवी आहे, असा मोठा दावा करत, हे सगळे होत असताना निवडणूक आयोग झोपून आहे. काहीही कारवाई करत नाही म्हणून आयोग भाजपाची बी टीम असल्याचा आरोप वडेट्टीवर यांनी केला.

दरम्यान, भाजपाला उद्याच्या निवडणूक निकालात यश मिळेल, असा आत्मविश्वास हा बोगस मतदान आणि पैशाच्या जोरावरच आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. सदोष मतदार यादी असून याबाबत वारंवार तक्रार करूनही निवडणूक आयोग काहीही करत नाही. भाजपाने निकालाची वाट न बघता गुलाल उधळला पाहिजे, असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Usurers' racket active, MahaYuti government anti-farmer: Vadettiwar

Web Summary : Vijay Wadettiwar alleges a kidney selling racket is active in Maharashtra, targeting farmers. He accuses the MahaYuti government of being anti-farmer and the Election Commission of favoring BJP, citing irregularities in local elections.
टॅग्स :congressकाँग्रेसVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारLocal Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५Farmerशेतकरी