शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

The Kashmir Files: “PM मोदींनी द काश्मीर फाइल्सप्रमाणे गुजरात फाइल्सचीही प्रसिद्धी करावी”: सुशीलकुमार शिंदे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 16:09 IST

The Kashmir Files: अद्याप तरी द काश्मीर फाइल्स चित्रपट पाहिला नसला तरी तो पाहणार असल्याचे सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटले आहे.

सोलापूर: विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट (The Kashmir Files) चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. काश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. मोठ्या संख्येने प्रेक्षक चित्रपटगृहात हजेरी लावत आहेत. अनेक बड्या चित्रपटांना टक्कर देत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा गल्ला जमवत २०० कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही या चित्रपटाचे कौतुक केले आहे. विरोधकांकडून मात्र यावरून केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर टीकास्त्र सोडण्यात येत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. 

द काश्मीर फाइल्स चित्रपट अजून पाहिलेला नाही. पण हा चित्रपट पाहीन, असे सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले. काश्मीरवर चित्रपट काढला असेल, तर ठीक आहे. मात्र, त्याआधी एका राणा नावांच्या लेखकांनी गुजरात फाइल्सवर फार चांगले लेखन केले आहे. त्यांनीही काढलेला आहे. पंतप्रधान मोदींनी त्याचीही प्रसिद्धी करावी आणि बॅलन्स करावे, अशी खोचक टीका सुशीलकुमार शिंदे यांनी केली आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते. 

काश्मीर फाइल्स टॅक्स फ्री कशाला? Youtube वर टाका

तत्पूर्वी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी द काश्मीर फाइल्स चित्रपट टॅक्स फ्री करण्याच्या मागणीवर प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचे लोक काश्मीर फाइल्स चित्रपट करमुक्त करण्याची मागणी करत आहेत. पण जास्तीत जास्त लोकांनी पाहावा यासाठी तुम्ही मागणी करत असाल तर मग दिग्दर्शकांना चित्रपट थेट यूट्यूबवर टाकायला सांगा तिथं लोकांना एकदम फ्री पाहता येईल, असा टोला अरविंद केजरीवाल यांनी लगावला.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत प्रतिक्रिया व्यक्त करताना, द काश्मीर फाइल्ससारखे चित्रपट बनायला हवेत. अशा चित्रपटांतून सत्य जनतेसमोर येत असते. गेल्या अनेक दशकांपासून जे सत्य लपवण्याचा प्रयत्न झाला त्याला समोर आणले जात आहे. त्यामुळे जे लोक सत्य लपवण्याचा प्रयत्न करतायेत ते आज विरोध करत आहेत, असा टोला त्यांनी काँग्रेसला नाव न घेता लगावला होता. 

टॅग्स :The Kashmir Filesद काश्मीर फाइल्सSushilkumar Shindeसुशिलकुमार शिंदेNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारण