शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

“मोदींनी देश विकायला काढलाय, हे लोकांच्या लक्षात आलेय; ९ वर्षांत...”: पृथ्वीराज चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 13:41 IST

Prithviraj Chavan on PM Modi Govt: देशातील १९ विरोधी पक्षांनी भाजपविरोधात आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीला ते आता रोखू शकत नाहीत, असा दावा पृथ्वीराज चव्हाणांनी केला आहे.

Prithviraj Chavan on PM Modi Govt: केंद्रातील मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपकडून उत्सव साजरा केला जात असताना, दुसरीकडे विरोधक मात्र या ९ वर्षातील कार्यकाळावरून केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका करताना पाहायला मिळत आहे. काँग्रेस नेते मोदी सरकारच्या कारभारावर टीका करत आहेत. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. 

मीडियाशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, केंद्रात मोदी सरकार स्थापन होऊन आज नऊ वर्षे पूर्ण झाली. मात्र, या नऊ वर्षांत देशात महागाई, बेरोजगारी वाढली. शेतकऱ्यांना हमीभाव नाही. शेतकरी उद्‌ध्वस्त झाला आहे. अदानींना फायदा करून देण्यासाठी भ्रष्टाचार केला, करात वाढ करून देशाला लुटले, देशात सुविधा देण्यास मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले, असा घणाघात पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. 

मोदींनी देश विकायला काढलाय, हे लोकांच्या लक्षात आलेय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू आता संपली आहे. १३५ लाख कोटी कर्ज काढून देशाला कर्जात लोटले. अनेक कंपन्या विकायला काढल्या आहेत. त्यामुळे देशातील अर्थव्यवस्था उद्‌ध्वस्त झाली. पंतप्रधान मोदींनी देश विकायला काढला, हे आता लोकांच्या लक्षात आले आहे. त्याचाच परिणाम म्हणून कर्नाटकमध्ये काँग्रेसची एकहाती सत्ता आली. अचानक केलेल्या नोटबंदीमुळे देश बेरोजगारी आणि आर्थिक संकटात आला आहे, हे सांगायला आता त्यांना तोंड नाही. त्यामुळे आज नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांना काँग्रेसकडून नऊ प्रश्‍न विचारले आहेत. त्याची त्यांनी उत्तरे द्यावीत, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

दरम्यान, ईडी, सीबीआयसारख्या संस्थांचा गैरवापर केला जात आहे. देशातील सामाजिक ऐक्य आणि शांतता धोक्यात आली. लव्ह जिहाद आणि इतर धार्मिक प्रश्न जाणीवपूर्वक उपस्थित करून देशाची दिशा बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. तसेच कर्नाटकमध्ये काँग्रेसचा एकहाती विजय झाला आहे. सर्व विभागांत त्यांना जनतेने नाकारले आहे. भाजपने कर्नाटकला धार्मिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न केला. त्याचा काहीही उपयोग झाला नाही. आता देशातील १९ विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजपविरोधात आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकाराने महाविकास आघाडीला ते आता रोखू शकत नाहीत, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला. 

 

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकार