शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेत प्रवेश सत्तारांचा अन् जल्लोष आमदार भुमरेंच्या कार्यकर्त्यांचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 13:45 IST

अब्दुल सत्तार यांनी सोमवारी मातोश्रीवर सेनेत प्रवेश केला.

मोसीन शेख 

मुंबई - काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू असतानाच त्यांनी रविवारी अचानक शिवसेनेत प्रवेश केला. सत्तार यांच्या प्रवेशाने औरंगाबाद जिल्ह्यात सेनेचे बळ वाढणार असल्याचे बोलले जात आहे. त्यातच त्यांच्या प्रवेशावेळी पैठणचे माजी नगराध्यक्ष आणि काँग्रेस नेते जितसिंग करकोटक यांनी सुद्धा हातात शिवबंधन बांधले आहे. करकोटक यांच्या प्रवेशाने पैठणचे शिवसेना आमदार संदीपान भुमरे यांची तालुक्यातील राजकीय ताकद वाढणार आहे. त्यामुळे पैठण तालुक्यातील शिवसैनिकांनी फटाके फोडत जल्लोष साजरा केला.अब्दुल सत्तार यांनी सोमवारी मातोश्रीवर सेनेत प्रवेश केला. त्यांच्या सोबत त्यांना मानणारा काँग्रेसमधील मोठा वर्ग सुद्ध शिवसेनेत गेला आहे. सेनेचा बालेकिल्ला आणि आमदार भुमरे यांचा मतदारसंघ असलेल्या पैठमधील काँग्रेसचे नेते जीतसिंग करकोटक यांनीसुद्धा सत्तार यांच्या सोबत शिवसेनेत प्रवेश केला. करकोटक यांच्या प्रवेशाने पैठणमधील सेनेचे ताकद वाढणार असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे करकोटक यांचा सेनेत प्रवेश होताच पैठणच्या शिवसैनिकांनी फटाके वाजवत जल्लोष साजरा केला.अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी माजी मंत्री अनिल पटेल यांची वर्णी लागली होती. त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे सूत्र पैठणकराच्या हाती आले. त्यातच अनिल पटेल राजकारणात सक्रिय झाल्याने पैठण तालुक्यातील काँग्रेसचे बळ वाढताना दिसत होते. मात्र आता त्याच पैठणमधील काँग्रेसच्या करकोट सारख्या महत्त्वाच्या नेत्याने सेनेत प्रवेश केल्याने भूमरेंना याचा फायदा नक्कीच होणार आहे.अब्दुल सत्तार यांचा पैठणमध्ये मानणारा मोठा वर्ग आहे. सत्तार मंत्री असताना पैठणमध्ये त्यांनी अनेकांना पक्षात घेऊन संधी देण्याचा काम केलं होत.  तसेच करकोटक यांची पैठण शहर भागात चांगली पकड आहे. मात्र आता ते सुद्धा सत्तार यांच्यासोबत शिवसेनेत आल्याने विधानसभा निवडणुकीत पैठणचे शिवसेनचे विद्यामान आमदार संदीपान भुमरे यांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळेच सत्तार आणि करकोटक यांच्या सेनाप्रवेशाने भुमरेंच्या गटात आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे.