शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
8
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
9
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
10
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
11
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
12
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
13
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
14
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
15
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
16
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
17
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
18
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
19
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
20
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट

राहुल गांधींसारखा नेता नको, गोव्यात काँग्रेस नेत्याची सोडचिठ्ठी

By admin | Updated: March 17, 2017 14:20 IST

आमदार विश्वजीत राणे यांनी पक्षाला सोडचि्ठी दिली असताना अजून एका नेत्याने पक्षातून काढता पाय घेतला आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 17 - गोव्यामध्ये क्रमांक एकचा पक्ष असूनही विरोधी बाकावर बसावं लागलेल्या काँग्रसेची घसरण सुरुच आहे. गुरुवारी आमदार विश्वजीत राणे यांनी पक्षाला सोडचि्ठी दिली असताना अजून एका नेत्याने पक्षातून काढता पाय घेतला आहे. सॅविओ रॉड्रीक्स यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे. राहुल गांधींना माझा नेता म्हणून मी स्विकारु शकत नाही असं म्हणत सॅविओ रॉड्रीक्स यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. सॅविओ रॉड्रीक्स हे गोवा काँग्रेसमधील अल्पसंख्यांक सेलचे उपाध्यक्ष होते.
 
टाईम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार 'काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी कोणतीही जबाबदारी घेत नाही आहेत. दिग्विजय सिंग काँग्रेसच्या परिस्थितीला जबाबदार आहेत', असं वक्तव्य सॅविओ रॉड्रीक्स यांनी केलं आहे. गोवा विधानसभेत पार पडलेल्या बहुमत चाचणीवर बोलताना सॅविओ रॉड्रीक्स यांनी ही टीका केली आहे. विशेष म्हणजे काँग्रसेच्या या पराभवला दिग्विजय सिंग जबाबदार असल्याचं मनोहर पर्रिकरही बोलले होते. 
 
(गोव्यात काँग्रेसला मोठा धक्का, विश्वजीत राणेंचा राजीनामा)
 
गोव्यात सर्वाधिक जागा जिंकूनही विरोधी पक्षात बसावे लागलेल्या काँग्रेसला गुरुवारी एक मोठा धक्का बसला. गोव्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते आणि आमदार विश्वजीत राणे यांनी पक्षाचा  राजीनामा दिला . गोव्यातील जनतेने जो कौल दिला त्याचा पक्षाने विश्वासघात केला असा आरोप विश्वजीत राणे यांनी केला. ते काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमधील मुख्य दावेदार होते. विश्वजीत राणे काँग्रेसला सोडचिठ्ठी देतील अशी चर्चा होती, अखेर ती खरी ठरली.  
 
'पक्षातील गैरव्यवस्थापनाविरोधातील हे माझं पहिलं पाऊल आहे. पक्षासोबत राहण्याचा माझा कोणताही विचार नाही. पक्षाला मी कंटाळलो असून पुन्हा निवडणूक लढण्यास तयार आहे', असं राणे बोलले होते.
 
गोव्यात सर्वाधिक 17 जागा जिंकूनही काँग्रेसला विरोधी बाकावर बसावे लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने भाजपला दोन दिवसांत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले होते. गोव्यात काँग्रेसला सर्वाधिक जागा (17) जिंकूनही सत्ता स्थापण्याचा दावा करता आला नाही, तर केवळ 13 जागा जिंकूनही राज्यपालांनी भाजपाला सरकार स्थापण्यासाठी आमंत्रण दिले, या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात कॉंग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती त्यामुळे याकडे देशाचं लक्ष लागलं होतं.
 
40 सदस्य असलेल्या विधानसभेत एकूण 22 आमदारांचे संख्याबळ पर्रीकर सरकारसोबत आहे. त्यात भाजपाचे स्वत:चे 13 आमदार आहेत. कुंकळयेकर यांची हंगामी सभापती म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय पर्रीकर यांनी घेतला. बुधवारी सकाळी त्याबाबतची फाईल सरकारने राज्यपालांकडे पाठवली व सायंकाळी राज्यपालांनी कुंकळयेकर यांना शपथ दिली. राजभवनवर त्या वेळी मुख्यमंत्री पर्रीकर उपस्थित होते. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी बुधवारी मंत्रालयात केबिनचा ताबा घेतला व काम सुरू केले. अन्य मंत्र्यांना अजून खाती मिळालेली नसल्याने त्यांनी केबिनचा ताबा घेतलेला नाही. बहुमत सिद्ध केल्यानंतर आपण खाते वाटपाची प्रक्रिया सुरू करीन, असे मुख्यमंत्री पर्रीकर यांनी म्हटले आहे.