शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस हा देशातील एकमेव लोकशाही रुजविणारा पक्ष- पृथ्वीराज चव्हाण

By प्रमोद सुकरे | Updated: October 17, 2022 21:40 IST

जवळपास २२ वर्षानंतर काँग्रेस पक्षात अध्यक्ष पदाची निवडणूक होत आहे ही अत्यंत समाधानाची बाब आहे.

कराड

जवळपास २२ वर्षानंतर काँग्रेस पक्षात अध्यक्ष पदाची निवडणूक होत आहे ही अत्यंत समाधानाची बाब आहे. लोकशाही गावागावात रुजविणारा काँग्रेस हा देशातील एकमेव पक्ष असल्याचे मत माजी मुख्यमंत्री आमदिर पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी आज माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीच्या मुंबई येथील टिळक भवन या राज्य मुख्यालयात मतदान केले. मतदान केल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.

पत्रकात  चव्हाण यांनी म्हटले आहे की, पक्षाच्या घटनेनुसार निवडणूक होऊन अध्यक्ष निवडला जावा या प्रमुख मागणीसाठी माझ्या सहित प्रमुख २३ नेत्यांनी आमच्या नेत्या सोनिया गांधी यांची दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन पक्ष संघटनेसाठी व पक्षाची प्रतिमा जनमानसात रुजावी यासाठी काही प्रमुख मागण्याचे सादरीकरण ऑगस्ट २०२० रोजी केले. त्यावर चर्चा केली. त्यावेळी या बैठकीत राहुल गांधी व प्रियांका गांधी सुद्धा उपस्थित होत्या. कोविड मुळे मागण्यांची अंमलबजावणी पक्षाकडून होण्यास जवळपास २ वर्षे लागली. परंतु आज त्यानुसार पक्षात निवडणूक होऊन अध्यक्ष निवडला जात आहे याचे समाधान आहे.

राहुल गांधी पक्षाचा सुपरिचित असा चेहरा आहे व त्यांनीच अध्यक्ष व्हावे अशी आमची मागणी होती. पण त्यासाठी निवडणूक होऊन त्यांनी पद घेतले जावे असे आम्हाला वाटतं होते. परंतु त्यांनी अनेकदा स्वतःच जाहीर केले की गांधी कुटुंबियांतील कोणीही पक्षाचा अध्यक्ष होणार नाही. व त्या मागणीचा आम्ही आदर करीत सद्याच्या होणाऱ्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडणुकीत आम्ही सहभागी झालो.

ही निवडणूक आज देशभरात पार पडली. देशभरात सुमारे ९८०० प्रदेश काँग्रेस कमिटी प्रतिनिधी मतदान देण्यास पात्र होते. यापैकी महाराष्ट्रातून जवळपास ५६१ प्रदेश प्रतिनिधी यांनी मुंबई येथे टिळक भवन या पक्षाच्या राज्य मुख्यालयात मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्रात जवळपास ९६% प्रदेश प्रतिनिधीनी मतदान केले अशी माहितीही चव्हाण यांनी दिली आहे.

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणcongressकाँग्रेस