शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 20:06 IST

Congress Harshwardhan Sapkal Ashadhi Pandharpur Wari News: जातीपातीच्या, धर्माच्या नावावर समाजात दुही माजवणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी ही परंपरा आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

Congress Harshwardhan Sapkal Ashadhi Pandharpur Wari News: एकीकडे अबू आझमी यांनी आषाढी वारीतील पालख्यांबाबत केलेल्या विधानावरून नवीन वाद निर्माण होताना पाहायला मिळत असून, दुसरीकडे मात्र वारकरी संतांच्या पालख्यांसोबत आनंद, समाधानाची अनुभूती घेताना दिसत आहेत. दरवर्षी प्रमाणे लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेण्याची आस प्रत्येक वारकऱ्याला लागलेली आहे. 

आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी व विठ्ठल भक्त पंढरपूरच्या दिशेने पायी चालत निघाले आहेत. वारीत सहभागी होऊन विठ्ठल भक्तीत रममाण होण्याचा मानस अनेकांचा असतो. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही वारीत चालण्याचा संकल्प केला आहे. मंगळवार, २४ जून रोजी सपकाळ हे दिंडीत सहभागी होत असून ते दिवसभर दिंडीसोबत चालणार आहेत. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील यवत गावातून दिंडी क्रमांक २८२ मध्ये सकाळी ७ वाजता हर्षवर्धन सपकाळ सहभागी होतील व वरवंड गावापर्यंत पायी चालतील, अशी माहिती देण्यात आली आहे.

धर्माच्या नावावर समाजात दुही माजवणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी ही परंपरा

याबाबत बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की,  पंढरपूरच्या वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. या वारीत कोणताही जात, धर्म, पंथ न पहाता शेकडो वर्षांपासून हा विठ्ठल भक्तीचा प्रवास सुरु आहे. सर्वजण विठ्ठ्लाच्या ओढीने पंढरपूरकडे पायी चालत जातात. महाराष्ट्र धर्म जागवण्याचे काम या वारीच्या माध्यमातून होत आहे. सर्वसामान्य भक्तांचा सखा विठुराया अशी सावळ्या विठूची ख्याती आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगतगुरु तुकाराम महाराज, संत एकनाथ, संत नामदेव, संत मुक्ताबाई, संत गजानन महाराज, संत चोखामेळा, संत जनाबाई अशा असंख्य संतांनी महाराष्ट्राला एक अध्यात्मिक वारसा घालून दिला आहे. पंढरपूरची वारी व संत परंपरा हीच भारताची खरी ओळख सांगणारा आहे. आज जातीपातीच्या, धर्माच्या नावावर समाजात दुही माजवणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी ही परंपरा आहे. या वारी परंपरेचा वारसा आपल्याला जपला पाहिजे. महाराष्ट्राच्या या गौरवशाली परंपरेत एक दिवस तरी वारी अनुभवावी म्हणून दिंडीत सहभागी होऊया, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचे पुण्यात आगमन झाल्यानंतर संपूर्ण शहर हरिनामाच्या गजरात न्हाले. एकूण ४ लाख ९० हजार वारकरी पुण्यात दाखल झाले होते. त्यांच्या स्वागतासाठी आणि सुरक्षिततेसाठी यंदा पुणे पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत एक अभिनव पाऊल उचलले. गर्दीचे व्यवस्थापन आणि संख्येचे विश्लेषण करण्यासाठी यासाठी प्रथमच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणालीचा वापर करण्यात आला. पुणे पोलिसांनी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी कॅमेरे आणि विशेष सॉफ्टवेअर बसवले होते. या प्रणालीद्वारे दोन्ही पालख्या शहरात दाखल होण्यापासून ते प्रस्थान होईपर्यंतची प्रत्येक हालचाल टिपली गेली.

 

टॅग्स :ashadhi wariआषाढी एकादशी वारी 2025Pandharpur Wariपंढरपूर वारीcongressकाँग्रेसHarshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळ