विकास दृष्टी असलेला नेता : दोन दशकांहून अधिक काळ अनभिषिक्त सम्राट म्हणून उमटवला ठसा
मुंबई : नेहरू-गांधी परिवाराशी जिव्हाळ्याचे संबंध असलेल्या मुरली देवरा यांनी मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली. त्यानंतर मात्र तब्बल दोन दशकांहून अधिक काळ देवरा यांनी मुंबई काँग्रेसची धुरा आपल्या खांद्यावर समर्थपणो वाहिली. शिवसेनेच्या चढत्या काळातही मुंबईत काँग्रेस वाढविण्यात देवरा यांचा मोठा हात आहे.
अर्थशास्त्रचे विद्यार्थी असणारे मुरली देवरा 1968 साली पहिल्यांदा पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर 1977-78 साली ते मुंबईचे महापौर बनले. महापौरपदानंतर 198क्मध्ये त्यांनी पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढविली. परंतु जनता पार्टीच्या रतनसिंह राजदा यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर 1984च्या निवडणुकीत मात्र देवरा पहिल्यांदा दक्षिण मुंबईतून खासदार म्हणून निवडून आले. 1984, 89 व 91 अशा सलग तीन निवडणुकांत त्यांनी खासदार म्हणून आपला गड राखला. त्याशिवाय 1998च्या लोकसभा निवडणुकीतही विजयी बनले.
1996 व 1999 साली मात्र भाजपाच्या जयवंतीबेन मेहता यांनी देवरा यांचा पराभव केला होता. लोकसभेतील पराभवानंतर काँग्रेसने 2क्क्2 साली त्यांना पहिल्यांदा राज्यसभेवर पाठविले. 2क्क्6 साली मणिशंकर अय्यर यांच्या जागी देवरांना केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रिपद देण्यात आले. देवरा तीन वेळा राज्यसभेत निवडून गेले. 2क्क्2, 2क्क्8 आणि आता नुकतेच फेब्रुवारी 2क्14मध्येही त्यांना काँग्रेसने राज्यसभेत पाठवले होते. 2क्2क् र्पयत त्यांचा राज्यसभेतील खासदारकीचा कार्यकाळ होता.
कालच मी मुरली देवरांच्या कुटुंबीयांशी बोलून त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती आणि आज त्यांच्या निधनाचीच दुर्दैवी बातमी कळाली़ त्यांच्या आत्म्याला शांती लाभो़ मी त्यांच्या कुटुंबीयांप्रती तीव्र संवेदना व्यक्त करतो असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टि¦टरवर म्हटले आह़े
निष्ठा, श्रद्धा अन् विश्वास यांचा अपूर्व मिलाफ
मुरली देवरा काळाच्या पडद्याआड जाण्याने काँग्रेस पक्षाप्रमाणोच माङयासारख्या त्यांच्यावर प्रेम करणा:या अनेकांची व्यक्तिगत हानी झाली आह़े इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचे ते मुंबईतील कान-डोळे होते. ते मुंबई काँग्रेसचे 22 वर्षे अध्यक्ष होते. त्याच काळात त्यांनी मुंबईत काँग्रेस मजबूत केली.
दिल्लीतून मुंबईत येणा:या नेत्यांचा अत्यंत आपुलकीने पाहुणचार करण्यात त्यांचा हात कोणीही धरू शकत नव्हते. देशातल्या एकूण एक वर्तमानपत्रंच्या व टीव्ही चॅनेल्सच्या संपादकांशी त्यांचा वैयक्तिक स्नेहसंबंध होता. उद्योग जगत आणि सरकार यामध्ये त्यांनी दूत म्हणून काम पाहिले. परदेशात विशेषत: अमेरिकेच्या सिनेटमध्ये त्यांचे खूप मित्र होते. ग्लोबल पार्लमेंटरी असोसिएशनचे उपाध्यक्ष या नात्याने त्यांनी भारताचे इतर देशांशी संबंध अधिक सुदृढ केले. संयमी आणि सर्वसमावेशक राजकारणाचा नवा मापदंड सिद्ध करणा:या या नेत्याने सहिष्णुतेचा वस्तुपाठ घालून दिला़ देवरा यांची माङो वडील स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा आणि माङयाशी वेगळीच मैत्री होती. शिवाय दर्डा परिवारालाही त्यांचा दीर्घकाळ स्नेह लाभला़ राज्यसभेत आम्ही एकत्र असल्याने हा स्नेहभाव अधिकच वृद्धिंगत होत गेला. पक्षावरील निष्ठा, मैत्रीवरील श्रद्धा आणि राजकारणावरील विश्वास यांचा अपूर्व मिलाफ त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता़ देवरा यांच्या जाण्याने झालेले दु:ख शब्दातीत आह़े त्यांचा ऊर्जामय स्नेह माङया चिरंतन स्मरणात राहील़
- विजय दर्डा, राज्यसभा
सदस्य तथा चेअरमन, लोकमत समूह
केंद्रीय मंत्रिमंडळातील कामगिरी
2006 साली पहिल्यांदा मुरली देवरा यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. मणिशंकर अय्यर यांच्या जागी ते पेट्रोलियम मंत्री बनले. पेट्रोलियम मंत्रलयाचा कारभार हाकताना म्यानमार, अल्जेरिया, इजिप्त आदी देशांचा दौरा त्यांनी केला होता. शिवाय मंत्री म्हणून सुदान, इथोपिया, कॉमोरॉस आदी देशांतील तेलमंत्र्यांशी वाटाघाटी केल्या.
2007साली देवरा यांनी पहिल्यावहिल्या भारत-आफ्रिका हायड्रोकार्बन परिसंवाद व प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन केले. जुलै 2क्11 साली त्यांच्याकडे कॉर्पोरेट अफेअर्स राज्यमंत्रिपदाची धुरा देण्यात आली.
मुरली देवरा हे मुंबईतील काँग्रेस पक्षाचे प्रतीक
होत़े एक खासदार आणि
एक मंत्री या नात्याने त्यांनी अपूर्व योगदान दिल़े एक समर्पित राजकीय नेते
म्हणून ते प्रत्येक प्रसंगी पक्षासोबत राहिल़े त्यांच्या निधनाने पक्षाने एक सच्चा काँग्रेसजन हरवला.
- सोनिया गांधी,
काँग्रेस अध्यक्षा
कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री मुरली देवरा यांनी देशासाठी निष्ठेने काम केले. दयाळू स्वभाव असल्याने गोरगरिबांसाठी त्यांनी अथक परिश्रमाने कार्य केले आहे. देवरा यांच्या जाण्याने अतिशय दु:ख झाले आहे.
- राहुल गांधी,
उपाध्यक्ष, कॉँग्रेस
देवरा यांचे राजकारणाच्या माध्यमातून भरीव सामाजिक योगदान होते. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानबंदी व्हावी, यासाठी त्यांनी कायदेशीर लढाई लढली होती. त्यांच्या निधनामुळे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे.
- एकनाथ शिंदे,
विरोधी पक्षनेते
मुंबईचे महापौर ते केंद्रीय मंत्री अशी वाटचाल करणा:या मुरली देवरा यांचा उद्योगपती, मोठय़ा संस्था यांच्याशी निकटचा संबंध असला तरी समाजातील विविध घटकांसाठी त्यांनी कार्य केले होते. विशेषत: तंबाखूविरोधात चालवलेली मोहीम, विद्याथ्र्यासाठी संगणक चळवळ, आरोग्य शिबिरे या माध्यमातून त्यांनी काम केले होते. त्यांच्या निधनाने विकासाची दृष्टी असलेला एक नेता राज्याने गमावला आहे.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
कॉँग्रेसचे झुंजार नेतृत्व हरवले आहे. अशा या उत्तम प्रशासकाची पोकळी भरून काढणो देशाला अशक्य आहे.
- मुख्तार अब्बास नकवी
अनंतात विलीन झाला. काँग्रेस आणि मुंबईतील जनता त्यांच्या कार्याला कधीही विसरू शकणार नाही.
- अजय माकन,
काँग्रेस नेते
गांधी कुटुंबाची
उपस्थिती
मृदू व संयमित स्वभावाच्या मुरली देवरा यांचे नेहरू-गांधी घराण्याशी अत्यंत घनिष्ठ संबंध होते. त्यामुळेच देवरा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी संपूर्ण गांधी कुटुंब सोमवारी मुंबईत उपस्थित होते. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वड्रा यांच्यासह खजिनदार मोतीलाल व्होरा, अहमद पटेल, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, गुरुदास कामत आदी उपस्थित होते.