लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : राजकीय वादातून काँग्रेसचा नगरसेवक सुभाष लोंढे याच्यासह त्याच्या कार्यकर्त्यांनी तरुणावर तलवारीने हल्ला करत गोळीबार केला. त्यात तरुण जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.जाधव पेट्रोलपंपाजवळ रविवारी रात्री साठेआठ वाजता केलेल्या गोळीबारात राहुल विठ्ठल गाढवे (रा़ सबजेल चौक, नगर) हा जखमी झाला.पोलिसांनी बारा जणांवर गुन्हा दाखल करत सुभाष लोंढे याचा पुतण्या दिनेश लोंढे यास ताब्यात घेतले. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे़ राहुल हा आधी लोंढे यांच्याकडे काम करत होता़काही दिवसांपूर्वी त्याला दुसºया पक्षाच्या नेत्याच्या संस्थेत नोकरी मिळाली़ ही बाब लोंढे परिवाराला खटकली होती.
काँग्रेस नगरसेवकाचा तरुणावर गोळीबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 04:46 IST