शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेसची उद्धवसेनेला गळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 06:24 IST

शरद पवार यांच्यासाठी ही जागा सोडावी, अशी मागणी शरद पवार गटातर्फे केली जात आहे. मात्र काँग्रेसकडून या जागेसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

- दीपक भातुसेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यसभेच्या सात जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीची एक जागा निवडून येऊ शकते. मात्र या एका जागेवरून महाविकास आघाडीत अद्याप निर्णय झालेला नाही. ५ मार्च रोजी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून येत्या दोन दिवसांत महाविकास आघाडीत राज्यसभेची ही एक जागा कोण लढवणार याचा निर्णय घ्यावा लागणार आहे.

शरद पवार यांच्यासाठी ही जागा सोडावी, अशी मागणी शरद पवार गटातर्फे केली जात आहे. मात्र काँग्रेसकडून या जागेसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी दिल्लीतील एका बड्या काँग्रेस नेत्याने उद्धव ठाकरेंशी फोनवर चर्चा करून ही जागा काँग्रेसला सोडण्याची गळ घातल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यसभेची जागा काँग्रेसला सोडावी आणि पुढील महिन्यात रिक्त होणाऱ्या विधानपरिषदेची जागा उद्धवसेनेने घ्यावी, असा प्रस्ताव काँग्रेसने ठाकरे यांच्यासमोर ठेवल्याचे समजते. दुसरीकडे उद्धवसेनेनेही या जागेवर दावा सांगितला आहे. तर उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील यांच्यातही नुकतीच या जागेबाबत चर्चा झाली आहे.

दरम्यान, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे सध्या राज्यसभेत विरोधी पक्षनेते आहेत. हे पद टिकवून ठेवण्यासाठी काँग्रेसला दोन जागा निवडून आणाव्या लागतील. तेलंगणातून एक जागा निश्चित असली तरी महाराष्ट्रातील दुसरी जागा मिळवणे काँग्रेससाठी अस्तित्वाचा प्रश्न बनला आहे. 

महाविकास आघाडी हा तीन तिघाडा आहे, पण काम बिघाडा नाही. एक जागा आहे आणि त्यासाठी तीनही पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे. शेवटच्या मिनिटांपर्यंत ती सुरू राहू शकते. लवकरच उमेदवारीबाबत अंतिम निर्णय जाहीर होईल.- संजय राऊत, नेते, उद्धवसेना

English
हिंदी सारांश
Web Title : Congress woos Uddhav Sena for Rajya Sabha seat support.

Web Summary : Congress pressures Uddhav Sena for Rajya Sabha seat amid coalition talks. Offer: Council seat for Rajya Sabha support. Thackeray, Pawar also vying. Congress needs Maharashtra win for Rajya Sabha leadership.
टॅग्स :Sharad Pawarशरद पवारRajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूक 2026