शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

चीनच्या मुद्यावर काँग्रेस एकाकी? काँग्रेसपासून शरद पवारांनी अंतर राखले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2020 08:19 IST

साताऱ्यात म्हणाले । चीनने १९६२ च्या युद्धानंतर ४५ हजार चौरस कि.मी. भूभाग बळकावला

हरीश गुप्ता

नवी दिल्ली : चीनच्या मुद्यावरून मोदी सरकारवर हल्ले होत असताना माजी संरक्षणमंत्री आणि काँग्रेसचा सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी स्वत:ला यापासून दूर ठेवले आहे.

सातारा येथे बोलताना शरद पवार म्हणाले की, चीनने १९६२ च्या युद्धानंतर जवळपास ४५ हजार चौरस कि.मी. भारतीय भूभाग बळकावला आहे. दरम्यान, पीएमओने २० जून रोजी स्पष्ट केले होते की, गत ६० वर्षांत देशाने ४३ हजार चौरस कि.मी. भाग गमावला आहे. मात्र, मोदी सरकारच्या काळात एक इंचही जमीन गमावली नाही. शरद पवार हे जाहीरपणे काँग्रेस पक्ष आणि त्यांचे नेते राहुल गांधी यांच्यासह सर्वांना सांगत आहेत की, हा मुद्दा राष्ट्रीय सुरक्षेचा आहे आणि याचे राजकारण करू नका. त्यांनी हे स्पष्ट केले की, चीनने आपला ४५ हजार चौरस कि.मी. भूभाग बळकावला आहे, हे कोणीही विसरू शकत नाही. शरद पवार यांचे असेही म्हणणे आहे की, गलवान खोऱ्यातील घटना ही संरक्षण मंत्रालयाचे अपयश आहे, अशा स्वरूपात लगेच पाहता येणार नाही. कारण, गस्तीवरील भारतीय सैनिक सतर्क होेते.चीनच्या मुद्यावर काँग्रेस एकाकी?चीनच्या मुद्यावर काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेपासून स्वत:ला दूर ठेवण्याची शरद पवार यांची ही चौथी वेळ आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सर्वपक्षीय बैठकीत शरद पवार यांनी काँग्रेसच्या भूमिकेपासून स्वत:ला दूर ठेवले. सरकारने विरोधी पक्षांची समोरासमोर बैठक घ्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली होती. त्यावेळीही पवार यांनी वेगळी भूमिका घेतली होती. एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी चीनच्या मुद्यावर काँग्रेसच्या भूमिकेवर असहमती दर्शविली होती. चीनच्या मुद्यावर काँग्रेस काही प्रमाणात एकाकी पडल्याचे दिसत आहे. कारण, कोणताही प्रमुख विरोधी पक्ष त्यांना समर्थन करताना दिसत नाही. अगदी डावे पक्ष, डीएमके, जेएमएम, ममता बॅनर्जी, सपा, बसपा, टीडीपी, वायएसआर काँग्रेस, टीआरएस, बेजेडी हे पक्षही थेट बोलत नाहीत. कारण, सीमेवर युद्धासारखी परिस्थिती आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारchinaचीनcongressकाँग्रेस