शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांच्या स्वहितामुळे काँग्रेस रसातळाला

By admin | Updated: July 10, 2017 01:26 IST

पुण्यामध्ये लोकसभा, विधानसभा, महापालिका अशा एका पाठोपाठ तिन्ही निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : स्वातंत्र्य चळवळीपासून काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यामध्ये लोकसभा, विधानसभा, महापालिका अशा एका पाठोपाठ तिन्ही निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर पक्षातील विविध गट-तट व नेते यांनी पक्षहितासाठी एकत्र येणे आवश्यक असताना, प्रत्यक्षात त्याच्या उलट पक्षात गटबाजीला मोठ्याप्रमाणात उधाण आले आहे. नेत्यांनी स्वहितावर लक्ष केंद्रित केल्याने पक्ष रसातळाला गेला असल्याची खंत कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नव्याने पक्षात येणाऱ्यांना ब्लॉक व जिल्हा पातळीवरची ५० टक्के पदे देऊन पक्षसंघटना वाढविण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे; मात्र पक्ष खऱ्या अर्थाने वाढवायचा असेल, तर काँग्रेस पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची अस्वस्थता दूर करण्याची सर्वांत पहिली आवश्यकता आहे.काँग्रेस पक्षाने अनेकांना मंत्रिपदे, खासदार, आमदारकी, महामंडळे, नगरसेवक व पक्षसंघटनेतील अनेक पदे देऊन मोठे केले. त्यांनी वर्षानुवर्षे सत्ता उपभोगली; मात्र आज पक्षसंघटनेचा अडचणीचा काळ असताना हेच लोक अचानक गायब झाले असल्याचे चित्र दिसून येत आहे. काँग्रेस पक्षात सध्या गटबाजीला उधाण आले आहे. महापालिका हद्दीलगतच्या ३४ गावांचा समावेश करण्याच्या विरोधात पक्षातील काही नेते व कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी हा पक्षाचा कार्यक्रम नसल्याचे जाहीर केले. एचसीएमटीआर रस्त्याच्या कामाला गती देण्यासाठी माजी उपमहापौर आबा बागुल यांनी आयुक्तांच्या गाडीला साखळदंडाने जखडण्याचे आंदोलन केले; मात्र या आंदोलनाला पालिकेतील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित नव्हते. पक्षातील मतभेद सातत्याने जाहीरपणे चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. पक्षात कुणीच कुणाचे ऐकत नसल्याची परिस्थिती आहे. स्वीकृत नगरसेवकपद मिळाले नाही, गट नेतेपदाची संधी मिळाली नाही; तसेच विशिष्ट हितसंबंध डोळ्यांसमोर ठेवून नेते कृती करू लागल्याने कार्यकर्ते सैरभैर झाली आहेत. पक्ष अडचणीत असताना आता नेत्यांनी किमान आता तरी स्वहित बाजूला ठेवावे, अशी भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वीच अनेक नगरसेवकांनी पक्षाला रामराम करून भाजपाचा रस्ता धरला होता. त्या वेळी शहर पातळीवरील व महापालिकेतील पक्ष नेतृत्वाची भूमिका महत्त्वाची होती; मात्र पक्षाकडून फारशा हालचाली न झाल्याने, आज पालिकेत काँग्रेस पक्ष ९ नगरसेवकांपुरता मर्यादित झाला आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा दारूण पराभव झाला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी देताना काही धाडसी निर्णय घेणे अपेक्षित होते; मात्र इथे भाकरी फिरवली गेली नाही, त्याची परिणीती विधानसभा निवडणुकीत आठही मतदारसंघांत पराभव होण्यात झाली. या दोन पराभवानंतर तरी धडा घेऊन काँग्रेस पक्ष महापालिका निवडणुकीला सर्व ताकदीनिशी सामोरे जाणे अपेक्षित होते; मात्र पालिका निवडणुकीतही एकसंध काँग्रेस दिसलीच नाही.कार्यकर्त्यांपेक्षा वारसदारांवरच भिस्तकाँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून आपल्या वारसदारांची व्यवस्था लावण्याची स्पर्धा लागली आहे. त्याचे लोण शहरातील पदाधिकाऱ्यांमध्ये पसरत असल्याचे दिसून येत आहे. केवळ मोठ्या घराण्याचा वारसा आहे म्हणून खासदार, आमदारकीची उमेदवारी देण्याची परंपरा खंडित करून लढावू कार्यकर्त्याला निवडणुकीच्या रिंगणात उरतविले गेले पाहिजे, अशी भावना व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे भाजपा तळातील कार्यर्त्यांना उमेदवारी, संघटनात्मक जबाबदारी देऊन मोठे करीत आहे. त्यामुळे सर्व पक्षातून भाजपात जाण्यासाठी कार्यकर्त्यांची रिघ लागली आहे. रस्त्यावरची लढाईही लढावीमहापालिकेमध्ये केवळ सभागृहात भाषणबाजी करून पक्ष मोठा होणार नाही. सभागृहाच्या बाहेर रस्त्यावरची लढाईही पक्षाला लढावी लागणार आहे. महापालिकेतील नेतृत्वाने उत्कृष्ट वक्तृत्वाबरोबरच संघटन बांधणीकडे लक्ष द्यावे. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी आपलेपणाने वागणे, परस्परांना आदर देणे आदी कौशल्येही त्यांनी आत्मसात करणे आवश्यक असल्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.>प्रदेश नेतृत्वाचे दुर्लक्ष : अहवाल पाठविण्याची यंत्रणा मोडीतशहर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये गटबाजीला आलेले उधाण, पक्षाची दिवसेंदिवस वाईट होत असलेली अवस्था, याची कोणतीही दखल प्रदेश नेतृत्वाकडून अद्याप घेण्यात आलेली नाही. पूर्वी निरीक्षक, संपर्कप्रमुख, प्रदेश पातळीवरील पदाधिकारी शहरातील घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून त्याचा वेळोवेळी प्रदेशाध्यक्षांना अहवाल द्यायचे, मात्र काँग्रेस पक्षातील ही यंत्रणाच आता मोडीत निघाल्याचे चित्र दिसून येत आहे. विधान परिषद निवडणुकीत काँगे्रस पक्षाचे ५१ नगरसेवक फुटले त्याचीही गंभीर दखल पक्षश्रेष्ठींकडून घेण्यात आली नाही.