शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

‘ईडी’चे अभिनंदन, आता इकडेही लक्ष द्या..! एकनाथ शिंदे, फडणवीसांना पत्र...

By अतुल कुलकर्णी | Updated: December 11, 2022 06:49 IST

अजित पवार यांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेचा आराखडा तयार केला होता, पण पैसा कसा उभारावा या विवंचनेत तो कागदावरच राहिला.

- अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई 

प्रिय देवेंद्र फडणवीसजी, नमस्कार! आज आपल्यासाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे. नागपूर ते मुंबई असा महामार्ग असला पाहिजे, असंं स्वप्न आपण आठ- नऊ वर्षांपूर्वी पाहिलं होतं. आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात या कामाला आपण गती दिली. त्यामुळे आज हा महामार्ग जनतेसाठी खुला होत आहे. बऱ्याचदा स्वप्न कोणीतरी बघतो... त्याची पूर्तता दुसराच कोणीतरी करतो... आणि तिसराच त्याचं उद्घाटन करतो..! हा आजवरचा इतिहास आहे. मुंबईतील ५५ उड्डाणपुलांचं रेखाटन १९७० ते ८० या काळातच सुरू झालं होतं. ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’चं असंच काहीसं होतं. १९९० च्या काळात तत्कालीन सार्वजनिक बांधकाम सचिव अजित पवार यांनी व त्याच्याही आधीच्या काही अधिकाऱ्यांनी या ‘एक्स्प्रेस वे’चं डिझाइन करून ठेवलं होतं; पण पैसे कसे उभे करायचे, या विवंचनेत तो मार्ग कागदावरच होता. नितीन गडकरी आले आणि त्यांनी पैसे कसे उभे करायचे, हे दाखवून दिलं. त्यातून ५५ उड्डाणपुलांसह ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मार्गी लागला. १९९५ मध्ये तांबे-देशपांडे या अधिकाऱ्यांच्या जोडगोळीने एमएसआरडीसीचा मार्ग मोकळा केला, हा इतिहास आहे. आपण ज्या महामार्गाचं स्वप्न पाहिलं, तो पूर्णही केला आणि आज त्याचं लोकार्पण होत आहे. असं फार क्वचित घडतं. या कामात आपल्याला तत्कालीन एमएसआरडीसीचे मंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भक्कम साथ लाभली. त्यामुळेच आपण दोघंही अभिनंदनास पात्र आहात. आपलं सरकार ‘ईडी’चं सरकार, असं म्हटलं गेलं; पण ‘ईडी’ चांगलं काम करू शकते, हे आपण उदाहरणासह दाखवलं आहे. 

आपल्याकडे मुंबई-पुणे हा अवघ्या ९४ किलोमीटरचा महामार्ग होता. जगाचा विचार केला, तर नॉर्थ अमेरिका ते साऊथ अमेरिका असा ४८ हजार किलोमीटर लांबीचा महाकाय हायवे जगात एकमेव आहे. जगाच्या स्पर्धेत महाराष्ट्र कुठेही नव्हता. जगाचं कशाला...? आपल्या देशात दिल्ली-अमृतसर-कतार हा एक्स्प्रेस वे ६३३ किलोमीटरचा आहे. तोदेखील अद्याप संपूर्णत: झालेला नाही. दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे तयार होत आहे, त्याला आणखी काही कालावधी लागणार आहे. त्याआधी भारतातील सर्वांत जास्त लांबीचा ७०१ किलोमीटर नागपूर ते मुंबई महामार्गाचा पहिला टप्पा, नागपूर ते शिर्डी हा ५२० किलोमीटरचा रस्ता आज खुला होईल. आपण पाहिलेलं स्वप्न आपल्याच कालावधीत पूर्ण होतानाचा आनंद शब्दातीत आहे. मधल्या अडीच वर्षांच्या काळात कोविडमुळे आणि राजकीय घडामोडींमुळे हे उद्घाटन लांबणीवर पडलं. अन्यथा, याचं उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कालावधीत झालं असतं. आपण तो राजकीय योगही बरोबर साधला..! राजकारण आणि समाजकारण याचा तोल साधत आपण हे साध्य केलं. त्या राजकीय काैशल्याबद्दल काैतुकच. मात्र, आता अन्य काही गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल.   

मुंबई-गोवा महामार्गाचं घोंगडं भिजत पडलं आहे. असंख्य वेळा आंदोलनं झाली.  हा मार्ग कधी पूर्ण होणार की, यासाठी त्या मार्गावरचा कोणी मुख्यमंत्री व्हावा लागेल का..?, असे प्रश्न विचारले जात आहेत. नको ते विषय लोकांच्या डोक्यात येण्याआधीच हा प्रश्न मार्गी लावा. मराठवाडा, खान्देशचे मुंबईशी जोडणारे रस्ते जर चांगले झाले तर, त्या विभागांनाही विकासाचं वारं स्पर्श करील. याशिवाय काही वेगळे प्रश्नही आहेत. त्यात आपल्यालाच लक्ष घालावं लागेल. काही आमदार त्यांना हवं ते काम कशा पद्धतीनं करून घेत आहेत, याच्या सुरस कथा रोज येत आहेत. एकच काम सकाळी एक आमदार त्याला हवं तसं करून घेतो, दुसरा आमदार दुपारी जाऊन तेच काम बदलून घेतो. त्यामुळे प्रशासनात नेमकं ऐकायचं कुणाचं, असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे.  

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्या आहेत. त्यावरून पोलिस दलातही वेगवेगळ्या चर्चा आहेत. आपण फाईल मंजूर करून पाठवलीही असेल. मात्र, ती मुख्यमंत्री कार्यालयात अडकली की अन्य कुठे..? याचाही शोध आपल्यालाच घ्यावा लागेल. महाराष्ट्रातील ५०० हून जास्त अधिकारी विनापोस्टिंग घरी बसून पगार घेत आहेत. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याला हे परवडणारं आहे का..? काही अधिकाऱ्यांच्या दर दहा-बारा दिवसाला बदल्या होत आहेत. एक किस्सा सांगतो. विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. त्यांच्याकडे काही आमदार एका अधिकाऱ्याची बदली करा, अशी तक्रार घेऊन गेले. विलासरावांनी त्यांच्या सचिवाला बोलावलं आणि विचारलं की, अमुक अधिकारी आपण सांगितलेलं काम ऐकतो का..? त्यावर त्या सचिवानं तत्काळ होकारार्थी उत्तर दिलं. तेव्हा विलासराव म्हणाले, जोपर्यंत आपण सांगितलेलं काम ऐकलं जात आहे तोपर्यंत ठीक आहे..! ही जरब त्यांनी कामातून निर्माण केली होती. रोज उठून बदल्या करण्यानं अधिकाऱ्यांमध्ये जरब निर्माण होणार नाही. उलट असंतोष निर्माण होईल. कोणीतरी जोशी नामक व्यक्तीला भेटल्याशिवाय बदल्या होत नाहीत, अशी उघड चर्चा सुरू आहे. अशा चर्चांना वेळीच आवर घालायला हवा. अन्यथा, चांगल्या कामांवर पाणी फिरायला वेळ लागणार नाही. असो! पुन्हा एकदा आपलं अभिनंदन!     

 - तुमचाच, बाबूराव 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस