शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी खात्यातील निविदेचा घोळ; रोख मदतीची समितीची शिफारस धुडकावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 04:03 IST

खाद्यवस्तू पुरविण्याचे कंत्राट होते २३१ कोटी रुपयांचे. आता हे कंत्राट विशिष्ट कंत्राटदारांनाच मिळावे यासाठी झारीतील शुक्राचार्यांनी बरोबर रचना केली. त्यांना सोईच्या व इतरांना जाचक ठराव्यात अशा अटी टाकण्यात आल्या.  

-  यदु जोशीमुंबई : राज्यातील साडेबारा लाख आदिवासी कुटुंबांना प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या खाद्यवस्तू पुरविण्याच्या निविदेतील अटी-शर्ती जाचक असल्याने त्या आता बदलायच्या म्हटले तरी ३१ मार्च २०२१ पूर्वी वस्तू पुरविता येणार नाहीत. म्हणून खाद्यवस्तू पुरवठ्याची निविदा रद्द करून चार हजार रुपये रोखीने द्यावेत किंवा निदान दोन हजार रुपये तरी रोखीने द्यावेत, ही अतिरिक्त मुख्य सचिवांच्या (वित्त) अध्यक्षतेखालील सुकाणू समितीने केलेली शिफारस धुडकावून विभागाने निविदा प्रक्रिया सुरूच ठेवली आहे. खाद्यवस्तू पुरविण्याचे कंत्राट होते २३१ कोटी रुपयांचे. आता हे कंत्राट विशिष्ट कंत्राटदारांनाच मिळावे यासाठी झारीतील शुक्राचार्यांनी बरोबर रचना केली. त्यांना सोईच्या व इतरांना जाचक ठराव्यात अशा अटी टाकण्यात आल्या.  १६ पैकी १२ निविदाधारकांनी त्याविषयी लेखी तक्रारी विभागाकडे केल्या आणि अटी शिथिल करण्याची मागणी केली. या खाद्यवस्तू पुरविण्यास काढावयाच्या निविदांच्या अटी-शर्ती निश्चित करण्याचे अधिकार अतिरिक्त मुख्य सचिवांच्या (वित्त) अध्यक्षतेखालील समितीला देण्यात आले होते. समितीने त्या निश्चित केल्या. मात्र त्यामध्ये बदल करून परत निविदा काढली तर चालू आर्थिक वर्ष संपण्याआधी म्हणजे ३१ मार्च २०२१ पूर्वी खाद्यवस्तू पुरविणे शक्य होणार नाही, असा अहवाल दिला आहे. वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या या समितीच्या अहवालावर आता आदिवासी विकास विभाग काय निर्णय घेतो, याबाबत उत्सुकता आहे. निविदा प्रक्रिया रद्द करून रोख रक्कम आदिवासींना देणार का, याची विचारणा करण्यासाठी आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तसेच टेक्स्ट मेसेजलाही प्रतिसाद दिला नाही. आदिवासींना ना रोख मिळाली ना खाद्यवस्तू कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये हजारो आदिवासी गावी परतले. रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला. साडेबारा लाख आदिवासी कुटुंबांना खावटीच्या स्वरूपात दोन हजार रुपये रोख आणि दोन हजार रुपयांच्या खाद्यवस्तू देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने ऑगस्टमध्ये घेतला होता. n ९ सप्टेंबरला जीआरदेखील निघाला, पण आतापर्यंत निविदांचा केवळ घोळ सुरू आहे. एकूण चार हजार रुपये डीबीटीच्या स्वरूपात दिले असते तर ते केव्हाच आदिवासींच्या बँक खात्यात जमा झाले असते. पण, आज तब्बल चार महिन्यांनंतर ना त्यांना रोख मिळाली ना खाद्यवस्तू.