शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांसाठीच्या परीक्षेत झाला गोंधळ; अनेक विवाहित महिला परीक्षेपासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 06:02 IST

ऑनलाइन झालेल्या या परीक्षेत अनेक केंद्रांवर अनेक वेळा संगणकच बंद पडले.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने शिक्षक पदासाठी आयबीपीएस कंपनीच्या माध्यमातून घेतलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी परीक्षेत (टीएआयटी) विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. ऑनलाइन झालेल्या या परीक्षेत अनेक केंद्रांवर अनेक वेळा संगणकच बंद पडले. संगणक सुरू झाल्यानंतर परीक्षार्थींना प्रश्न पुन्हा सोडवावे लागले. त्यात त्यांचा बराच वेळ गेल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. त्याशिवाय अनेक जिल्ह्यांत १४० पेक्षा अधिक विवाहितांकडे विवाह प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांना परीक्षा देण्यापासून वंचित ठेवण्यात आल्याची तक्रारही परीक्षार्थींनी केली आहे. 

अडीच लाखांहून जास्त उमेदवार

२४ मे ते ५ जूनदरम्यान ही परीक्षा घेण्यात आली. तीन वर्षांनंतर ही परीक्षा होत असल्याने परीक्षार्थींना खूप आशा आहेत. परंतु, चांगली तयारी करूनही तांत्रिक अडचणींमुळे अनेकांना पेपर पूर्ण सोडविता आला नाही. अनेक केंद्रांवर अचानक संगणक बंद झाले. संगणक पुन्हा सुरू झाल्यावर सोडविलेले काही प्रश्न पुन्हा सोडवावे लागले. त्यात वेळ गेल्याचे एका परीक्षार्थीने सांगितले. 

जवळपास अडीच लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी ही परीक्षा दिली आहे. उमेदवारांनी निवडलेला जिल्हा सोडून मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी असलेल्या केंद्रांवर परीक्षा झाली. या सर्व प्रकारात उमेदवारांचे नुकसान झाले असून, त्यांना न्याय मिळावा, अशी मागणी युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष तुषार देशमुख तसेच परीक्षार्थींनी परीक्षा परिषद तसेच नेमलेल्या परीक्षा केंद्रांकडे केली आहे.

विवाहित महिलांच्या पॅन कार्डवर दोन्हीकडील नावाचा उल्लेख असतो, ते सादर करूनही त्यांना परीक्षेस बसू दिले नाही. सोबत तांत्रिक अडचणींचाही सामना करावा लागला.-महेश घरबुडे, अध्यक्ष, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशन

अनेक परीक्षा केंद्रांवर संगणकात तांत्रिक बिघाड झाल्याचे अनेकांनी कळविले. छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्ह्यातील सर्वांत जास्त विद्यार्थ्यांना परीक्षा देताना अडचणी आल्या. -प्रशांत शिरगुर, उपाध्यक्ष, पवित्र पोर्टल शिक्षक भरती संघटना

माझी परीक्षा ज्या केंद्रावर पार पडली तिथे अनेक वेळा संगणक बंद पडत होता, त्यामुळे पुढील वेळेचेही नियोजन करता आले नाही. -सोनाली वडे, परीक्षार्थी

टॅग्स :examपरीक्षाTeacherशिक्षक