शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागाच्या परीक्षेत राज्यभरात गोंधळात गाेंधळ; परीक्षा केंद्र शोधताना उमेदवारांचे हाल, अनेकांची दुसऱ्या सत्राची परीक्षा हुकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 06:35 IST

health department exams : आधी दोन वेळा परीक्षा रद्द करूनही तिसऱ्या वेळी परीक्षांच्या नियोजनात राज्यभरात मोठा गोंधळ झाल्याचे दिसून आले. अनेक उमेदवारांना एका सत्राची परीक्षा देता आली, तर दुसऱ्या सत्राची परीक्षा देता आली नाही. 

पुणे/औरंगाबाद/नाशिक : परीक्षा केंद्रावर बैठक व्यवस्था नसणे, पेपर उशिरा सुरू होणे, चुकीची प्रश्नपत्रिका देणे अशा अनेक समस्यांचा सामना रविवारी झालेल्या सार्वजनिक आराेग्य विभागाच्या गट-कमधील सर्व रिक्त पदे भरण्यासाठी झालेल्या परीक्षेदरम्यान उमेदवारांना करावा लागला. आधी दोन वेळा परीक्षा रद्द करूनही तिसऱ्या वेळी परीक्षांच्या नियोजनात राज्यभरात मोठा गोंधळ झाल्याचे दिसून आले. अनेक उमेदवारांना एका सत्राची परीक्षा देता आली, तर दुसऱ्या सत्राची परीक्षा देता आली नाही. 

पुण्यातील आबेदा इनामदार कॉलेजमधील परीक्षा केंद्रावर उमेदवारांचे पेपर नियोजित वेळेत सुरू झाले नाहीत. प्रश्नपत्रिकासुद्धा व्यवस्थित सील केलेल्या नव्हत्या, असा आरोप उमेदवारांकडून केला जात आहे. काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या कंपनीला परीक्षा घेण्याचे काम का देण्यात आले, याची चौकशी करण्याची मागणी परीक्षार्थींनी केली. तीन वर्गांमध्ये प्रश्नपत्रिकांची अदलाबदल झाली होती. प्रश्नपत्रिका बदलून दिल्या. विद्यार्थ्यांना वेळ वाढवून देण्यात आला.  अशी माहिती कोल्हापूरचे जिल्हा शल्यचिकित्सक अनिल माळी यांनी दिली.

औरंगाबाद  ३६ टक्के उमेदवार गैरहजरऔरंगाबादला दुपारच्या सत्रात १६ हजार ५९० उमेदवार परीक्षा देणार होते. सकाळच्या तुलनेत दुपारी उपस्थिती अधिक राहिली. एकूण १० हजार ४७६ जणांनी परीक्षा दिली, तर ३६ टक्के म्हणजे ६ हजार ११४ उमेदवार गैरहजर राहिले. औरंगाबादला एका केंद्रावर एका कोरोनाबाधित युवतीने पीपीई किट घालून परीक्षा दिली. औरंगाबादला परीक्षेसाठी कोणी नंदुरबार, कोणी परभणी तर कोणी जालन्याहून आले होते; पण परीक्षेची वेळ होईपर्यंत अनेकांना औरंगाबादेतील केंद्रेच सापडली नाहीत. गल्लीबोळातील केंद्र शोधताना अनेकांना मोबाइलमधील ॲपने गोल गोल फिरविले. 

नाशिक  उपसंचालक अहवाल देणार विविध परीक्षा केंद्रांवर सकाळ सत्रात १७ हजार ३६८ व दुपारच्या सत्रात १८ हजार ३८५ असे एकूण ३५ हजार ७३५ उमेदवार प्रविष्ट झाले होते. यापैकी तब्बल १६ हजार ७४८ उमेदवारांनी परीक्षेला दांडी मारल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. काही केंद्रांवर प्रश्नपत्रिका उशिरा पोहोचल्याने गैरप्रकाराचा आक्षेप परीक्षार्थींनी नोंदविला. आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून परीक्षा नियोजन करणाऱ्या न्यासा संस्थेच्या ढिसाळ कारभाराविषयी शासनाला अहवाल सादर केला जाणार असल्याचे आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ यांनी सांगितले.

आरोग्यमंत्री टाेपे यांनी  राजीनामा घावा - भाजपआरोग्य विभागाच्या परीक्षेत गोंधळ उडाल्याने  विद्यार्थ्यांना मनस्ताप झाला.  याला  आरोग्यमंत्री राजेश टोपे हेच जबाबदार असून, त्याची जबाबदारी स्वीकारत टोपे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी केली आहे. 

काही उमेदवारांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. काही परीक्षा केंद्रांवर बसवलेले जॅमर कार्यान्वित नव्हते. त्यामुळे परीक्षेच्या पारदर्शकतेबाबत शंका निर्माण होते.- तानाजी तेलंग, उमेदवार, पुणे

टॅग्स :Healthआरोग्य