शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

संघर्ष मुंबई कुणाल चषकाचा मानकरी

By admin | Updated: February 16, 2015 23:11 IST

कणकवली येथे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा

कणकवली : येथील विद्यामंदिर हायस्कूलच्या पटांगणावर आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत अटीतटीच्या अंतिम सामन्यात मुंबई उपनगर येथील संघर्ष संघाने विजय संपादन करीत कुणाल चषकावर आपले नाव कोरले. या स्पर्धेत मुंबई उपनगर येथील उत्कर्ष संघ उपविजेता ठरला. तर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून संघर्षच्या योगेश सावंत याची निवड करण्यात आली. कुणाल बागवे कला-क्रीडा मंडळाच्यावतीने १२ फेब्रुवारीपासून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. १५ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता मुंबई उपनगर येथील संघर्ष व उत्कर्ष संघामध्ये अंतिम सामना रंगला.या राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट चढाईपटू म्हणून उत्कर्ष संघाच्या सुयोग राजा याची तर उत्कृष्ट पकडीसाठी संघर्ष संघाच्या नितीन मोरे याला गौरविण्यात आले. अंतिम सामन्यातील विजेत्यांना सुवर्णपदक तर उपविजेत्या संघातील खेळाडूंना रौप्य पदक देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामना संघर्ष विरुद्ध उत्कर्ष मुंबई यांच्यात झाला. पहिल्या डावात संघर्ष संघाकडे असणारी दोन गुणांची आघाडी कायम ठेवत सरतेशेवटी संघर्ष संघाने १७-१५ अशा गुणांनी कुणाल चषकावर अखेर आपले नाव कोरले. हजारो क्रीडा रसिकांच्या उपस्थितीत या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ करण्यात आला. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, सिने अभिनेत्री ऋजुता देशमुख, सिने दिग्दर्शक दीपक कदम, युवा नेते संदेश पारकर, मालवण उपनगराध्यक्ष राजन वराडकर, भाई सावंत, समृद्धी पारकर, रुपेश नार्वेकर, अवधूत मालणकर, कन्हैया पारकर, विशाल डामरी, परेश बागवे, योगेश तामाणेकर, महेंद्र मराठे, शशांक बोर्डवेकर, निनाद दीपनाईक, अमोल पेडणेकर, हरेश निखार्गे, गौरव हर्णे, महेश सावंत आदी उपस्थित होते.सतीश सावंत, संदेश पारकर आदींनी मनोगत व्यक्त करताना स्पर्धा आयोजनाबाबत मंडळाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शामसुंदर सावंत यांनी केले. महाराष्ट्र राज्य कबड्डी फेडरेशनचे प्रभारी कार्यवाह संभाजी पाटील, थायलंड कबड्डी संघाचे प्रशिक्षक रमेश भेंडगिरी यांनी स्पर्धास्थळी भेट दिली. (वार्ताहर)कोकणचे सौंदर्य अप्रतिमनिसर्गसंपन्न अशा कोकणात कबड्डीसारख्या खेळाची राज्यस्तरीय स्पर्धा सलग दहा वर्षे आयोजित करून कुणाल बागवे मित्रमंडळाने एक विक्रम रचला आहे. अशा शब्दांत सिने अभिनेत्री ऋजुता देशमुख यांनी मंडळाचे कौतुक करतानाच खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.कणकवली येथे कुणाल बागवे स्मृती राज्यस्तरीय स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या मुंबई उपनगर येथील संघर्ष संघाला सिनेअभिनेत्री ऋजुता देशमुख यांनी पारितोषिक देऊन गौरविले. यावेळी डावीकडून काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, संदेश पारकर, समृद्धी पारकर, राजन वराडकर, रुपेश नार्वेकर आदी उपस्थित होते.