शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

जप्त केलेली १९४४ ईव्हीएम पुन्हा वापरण्यास परवानगी; उच्च न्यायालयाच्या निकालामुळे निवडणूक आयोगाला अखेर दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 15:09 IST

रत्नागिरी-सिंधदुर्ग मतदारसंघातून भाजप नेते  नारायण राणे फसवणूक करून निवडून आले, असा आरोप करत ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

मुंबई : उद्धवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्या २०२४ च्या लोकसभा  निवडणुकीला आव्हान दिल्याने रत्नागिरी जिल्ह्यातून जप्त केलेली १९४४ ईव्हीएम यंत्र आगामी विधानसभा निवडणुकीच्या वापराकरिता मोकळी करण्यास उच्च न्यायालयाने  केंद्रीय निवडणूक आयोगाला परवानगी दिली आहे. रत्नागिरी-सिंधदुर्ग मतदारसंघातून भाजप नेते  नारायण राणे फसवणूक करून निवडून आले, असा आरोप करत ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 

यंत्रे आयोगाच्याच ताब्यातराऊत यांच्या याचिकेमुळे रत्नागिरी-सिंधदुर्ग मतदारसंघातील १९४४ बॅलेट युनिट आणि १९४४ कंट्रोल युनिटचा समावेश असलेली तेवढीच ईव्हीएम यंत्रे जप्त करत निवडणूक आयोगाच्या ताब्यात ठेवण्यात आली. न्यायालयासमोर पुरावा म्हणून सादर करण्यासाठी ही कार्यवाही  करण्यात आली. मात्र त्याबाबत राऊत यांनी कोणताही आक्षेप नोंदवला नाही.

...म्हणून विनंती मान्यसंबंधित ईव्हीएम यंत्रांबाबत राऊत यांना कोणताही आक्षेप नाही. या यंत्रांमुळे गैरप्रकार घडल्याचीही तक्रार नाही वा ती न्यायालयात सादर करण्याची मागणीही राऊत यांनी केलेली नाही. त्यामुळे ही यंत्रे वापरण्याकरिता मोकळी करून आगामी विधानसभा निवडणुकीदरम्यान वापरण्यास परवनागी द्यावी, या मागणीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ॲड. ए. पी. कुलकर्णी यांच्याद्वारे याचिका दाखल केली होती.त्यावर न्या. सारंग कोतवाल व न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. न्यायालयाने त्यांची विनंती मान्य करत आता १९४४ ईव्हीएम यंत्र आगामी निवडणुकीसाठी वापरण्यास परवानगी दिली आहे.

नियम नेमके काय सांगतो?- नियमानुसार, या यंत्रांमधील डेटा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर ४५ दिवस डिलीट करू शकत नाही किंवा पुन्हा त्याचा वापर करू शकत नाही. - या काळात एखाद्या उमेदवाराने निवडणूक याचिका दाखल केली आणि त्यात ईव्हीएमसंबंधी महत्त्वाचे पुरावे असल्याचा दावा केला, तर संबंधित ईव्हीएम यंत्र निवडणूक अधिकाऱ्यांच्या ताब्यात ठेवण्यात येतात.

 

टॅग्स :EVM Machineईव्हीएम मशीनCourtन्यायालय