शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेमंत्र्यांची प्रकृती खालावली, उपचारासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 22:40 IST

मुंबई- मुंबईच्या दौऱ्यावर असलेले रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची तब्येत अचानक खालावली आहे. त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपचारासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मुंबई- मुंबईच्या दौऱ्यावर असलेले रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची तब्येत अचानक खालावली आहे. त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपचारासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पीयूष गोयल एलफिन्स्टन पुलाच्या कामाची पाहणी करण्यासाठी सध्या मुंबईत आले आहेत. एलफिन्स्टन पुलाच्या कामाच्या पाहणीनंतर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी पत्रकार परिषद घेणार होते. संध्याकाळी 6.30 वाजता ही पत्रकार परिषद नियोजित होती. मात्र तत्पूर्वीच त्यांच्या पोटात दुखू लागल्यामुळे त्यांना येथील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एलफिन्स्टन पुलाच्या कामाच्या पाहणी दौ-यानंतर गोयल यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक बोलावली होती. बैठकीदरम्यानच त्यांना पोटदुखीचा प्रचंड त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना बैठक अर्ध्यावरच सोडून ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोयल यांना बोलतानाही काहीसा त्रास होत असतानाच अचानक ही पोटदुखी उफाळून आली. त्यांच्या पोटात असह्य वेदना होऊ लागल्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

रेल्वेमंत्र्यांसह एलफिन्स्टन पुलाच्या बांधकामाची पाहणी केल्याचीही माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, कामाचा वेग कसा आहे, नेमके काम कुठवर आले ?, काम वेळेत पूर्ण होईल की नाही याचा आढावा रेल्वेमंत्र्यांनी दुपारच्या वेळी घेतला. दिलेल्या वेळेच्या आधी हा पूल पूर्ण होईल याची आम्हाला खात्री आहे, अशी माहिती पीयूष गोयल यांनी दिली आहे. मात्र यानंतर जेव्हा ते रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत होते, तेव्हा त्यांना अचानक त्रास होऊ लागला. सध्या त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचीही माहिती समजते आहे.

टॅग्स :piyush goyalपीयुष गोयल