शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

जवाहर द्विपावरील बीपीसीएल टँकरला लागलेल्या आगीवर पूर्णतः नियंत्रण, कूलिंग ऑपरेशन सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2017 17:00 IST

मुंबई- भाऊच्या धक्क्याजवळच्या बुचर द्विपावर समुद्रातील तेलाचा साठा करणाऱ्या टाक्यांना लागलेल्या आगीवर आज अखेर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.

मुंबई- भाऊच्या धक्क्याजवळच्या बुचर द्विपावर समुद्रातील तेलाचा साठा करणाऱ्या टाक्यांना लागलेल्या आगीवर आज अखेर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून तब्बत 40 तासांनी म्हणजेच तीन दिवसांनी आग पूर्णतः आटोक्यात आणली आहे. सध्या जवाहर द्विपावर कूलिंग ऑपरेशन सुरू असल्याची माहिती अग्निशामक दलाच्या जवानांनी दिली आहे.या आगीमध्ये तेलाच्या टाक्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शुक्रवारी संध्याकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती. आग लागण्याच्या घटनेला 15 तासांहून अधिक काळ उलटला आहे. मात्र हे अग्नितांडव शमलेले नाही. जवाहर द्वीपावर ही दुर्घटना घडली आहे. ही आग मोठी असल्यानं तिच्यावर 40 तासांनी नियंत्रण मिळवलं आहे. आग नेमकी कशामुळे लागली याबाबत कोणतीही ठोस  मिळालेली नाही. मात्र टाक्यांवर वीज कोसळून लाग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता.  13 आणि 14 क्रमांकाच्या तेलटाक्यांना आग लागल्याची माहिती समोर आली होती.या बेटावर 15 ते 20 टँक आहेत. त्यापैकी 12 नंबरच्या टँकला आग लागल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. समुद्रातून तेल काढून मोठ्या जहाजाद्वारे जवाहर द्विपवर आणली जातात. तेथे डिझेल साठवून ठेवले जाते. शुक्रवारी सायंकाळी मोठा पाऊस झाला आणि त्याचवेळी तेथे वीज कोसळली. त्यामुळे स्पार्किंग होऊन डिझेल टँकला आग लागली होती. काही वेळातच ही आग भडकली. आता समुद्रात आग विझवण्यासाठी बंब कसे न्यायचे यासाठी यंत्रणा कामाला लागली होती. अखेर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश  आलं आहे.   

टॅग्स :fireआग