शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय आयुक्तांविरोधात लाचेची तक्रार; निलंबित उपजिल्हाधिका-यांची फिर्याद, एक कोटीची रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 00:56 IST

कुळ, मदतमास, महारहाडोळा जमीन विक्री परवानगीत अनियमितता केल्याच्या आरोपावरून निलंबित केलेले उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांनी बुधवारी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्याविरोधात एक कोटींची लाच मागितल्याची तक्रार केली आहे.

औरंगाबाद : कुळ, मदतमास, महारहाडोळा जमीन विक्री परवानगीत अनियमितता केल्याच्या आरोपावरून निलंबित केलेले उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांनी बुधवारी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्याविरोधात एक कोटींची लाच मागितल्याची तक्रार केली आहे. जातीवादातून कारवाई केल्याचा आरोपही कटके यांनी सिटीचौक पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केला आहे.कटके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री, पालकमंत्री, महसूल खात्याच्या प्रधान सचिवांकडेदेखील तक्रार केली आहे. जमीन विक्री प्रकरणात अनियमितता केल्याप्रकरणी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे आणि उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांचे १८ डिसेंबरला डॉ. भापकर यांनी निलंबन केले. उपजिल्हाधिकारी पांडुरंग कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या अहवाल दिला होता. सोबतच अप्पर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र राजपूत, सेवानिवृत्त अप्पर जिल्हाधिकारी किसनराव लवांडे यांनाही आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावली होती.भापकर यांनी उपजिल्हाधिकारी कुलकर्णी यांना हाताशी धरून खोट्या सबबी पुढे करून चौकशी केली. १ कोटी रुपयांची माझ्याकडे मागणी केली. खुलासा करण्याची संधी न देता व जिल्हाधिकाºयांचे अभिप्राय न घेताच बेकायदेशीरपणे निलंबन केले. मी मागासवर्गीय अधिकारी असल्यामुळे जाती, द्वेषभावनेतून त्यांनी मला वारंवार अपमानास्पद वागणूक दिली. अधिकाºयांना निलंबित करायचे व त्यांना पुन:स्थापित करण्यासाठी रक्कम मागायची, ही भापकर यांची कार्यशैली असल्याचे कटके यांनी तक्रारीत म्हटलेआहे.परभणीचे पुरवठा अधिकारी, तहसीलदारांना निलंबित केल्यानंतर तहसीलदाराला रुजू करून घेतले. पुरवठा अधिकाºयांनी एसीबीकडे तक्रार केल्यानंतर त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले. तत्कालीन आयुक्तांनी निलंबित केलेले अनेक तहसीलदार चिरीमिरी करून सेवेत घेतले. हिंगोली, पैठणचे तत्कालीन तहसीलदारदेखील याच पॅटर्ननुसार पुन्हा सेवेत आले. याबाबत पुरावे असल्याचा दावा कटके यांनी केला आहे. अर्जानुसार चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.डॉ. भापकर यांना तक्रारीवर काहीही प्रतिक्रिया दिली नाही, तर चौकशी समितीचे अधिकारी कुलकर्णी यांनीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.जिल्हाधिका-यांनी दिला अभिप्रायजिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ५ जानेवारीला विभागीय आयुक्तांना जमिनींच्या अनियमितता प्रकरणात अभिप्राय दिला. त्यामध्ये कटके हे निर्दोष असून, त्यांचे निलंबन रद्द करून त्यांना शासनसेवेत पुन:स्थापित करण्याची शिफारस त्यांनी केली आहे.१ कोटी रुपये लाच मागितल्याची तक्रार असेल, तर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवावी. प्राप्त तक्रारीवर विधिज्ञांचा सल्ला घेऊन कायदेशीर कारवाई केली जाईल.- यशस्वी यादव,पोलीस आयुक्त,औरंगाबाद शहर

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद