शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'उत्सव'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
3
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
4
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
5
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
6
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
7
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
8
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
9
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
10
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
11
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
12
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
13
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

मंत्र्यांच्या पीएविरुद्ध विनयभंगाची तक्रार

By admin | Updated: June 21, 2016 03:38 IST

आरोग्य खात्यातील बदल्यांमधील भ्रष्टाचार आणि बदल्यांमधील अर्थपूर्ण व्यवहारांमुळे आरोपांच्या घेऱ्यात असलेले आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांचे खासगी सचिव सुनील माळीविरुद्ध

मुंबई : आरोग्य खात्यातील बदल्यांमधील भ्रष्टाचार आणि बदल्यांमधील अर्थपूर्ण व्यवहारांमुळे आरोपांच्या घेऱ्यात असलेले आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांचे खासगी सचिव सुनील माळीविरुद्ध एका वैद्यकीय अधिकारी महिलेने मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे माळी यांना आज सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात एका प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी असलेल्या एका वैद्यकीय अधिकारी महिलेशी माळी यांनी गैरवर्तणूक केली होती. याबाबत संबंधित महिलेने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दोन दिवसांपूर्वी तक्रार केली होती. त्यानंतर आज मुंबईत येऊन मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात माळींविरुद्ध विनयभंगाची तक्रार दाखल केली. चार तास ही महिला पोलीस ठाण्यात ठाण मांडून होती, त्यानंतर कुठे पोलिसांनी तक्रार दाखल करवून घेतली. पण रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल केला नव्हता. सूत्रांनी सांगितले की, ‘आपण तक्रार करू नका’असा फोन एका मंत्र्यांने संबंधित डॉक्टर महिलेस केला होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले की, कथित घटना १६ मार्चला घडलेली होती. आता तिने तीन महिन्यांनंतर तक्रार केलेली आहे. तिची शाहनिशा करुनच गुन्हा दाखल करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. (विशेष प्रतिनिधी)माळी यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही आणि आरोग्य मंत्र्यांनी त्यांची हकालपट्टी केली नाही तर मंगळवारपासून आपण आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी महिलेने लोकमतला सांगितले. आपल्या या आंदोलनाला आरोग्य अधिकरी, कर्मचारी आणि त्यांच्या संघटनांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. डॉ. सावंत मुख्यमंत्र्यांकडेआरोग्य खात्यात बदल्यांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचे आरोप आणि पीए सुनील माळीने एका वैद्यकीय अधिकारी महिलेचा केलेला कथित विनयभंग या पार्श्वभूमीवर, आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेऊन सफाई दिली, असे सूत्रांनी सांगितले. विनयभंगाच्या प्रकरणाची चौकशी आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता करतील, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.थातूरमातूर कारवाईबदल्यांचे घोटाळे आणि विनयभंगासारख्या तक्रारी असताना सुनील माळी यांना केवळ सक्तीच्या रजेवर पाठविल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ते उपजिल्हाधिकारी असून प्रतिनियुक्तीवर मंत्री कार्यालयात आलेले आहेत. तथापि, आरोग्य मंत्री सावंत यांनी प्रसार माध्यमांना सांगितले की, कुणालाही पाठीशी घालण्याची भूमिका मी घेणार नाही पण कुणावर अन्यायदेखील होऊ देणार नाही.