शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मलिक यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा गुन्हा, जयकुमार रावल यांची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 04:41 IST

विखरण येथील शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूचे राजकीय भांडवल करून तथ्यहीन व खोटे आरोप करून राजकीय व सामाजिक बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मालिक यांच्या विरोधात दोंडाईचा पोलिसात अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल झाला आहे.

दोंडाईचा (धुळे) : विखरण येथील शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूचे राजकीय भांडवल करून तथ्यहीन व खोटे आरोप करून राजकीय व सामाजिक बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मालिक यांच्या विरोधात दोंडाईचा पोलिसात अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल झाला आहे. रोजगार हमी व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी याबाबत तक्रार दिली होती. याशिवाय न्यायालयातही स्वतंत्र तक्रार दाखल करण्यात आली आहे.दोंडाईचा येथे मंगळवारी अ‍ॅड. एकनाथ भावसार यांच्यामार्फत मंत्री रावल यांनी दोंडाईचा न्यायालय व पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, नवाब मलिक यांनी धर्मा पाटील यांच्या मृत्यूचे राजकीय भांडवल करीत आपली वृत्तवाहिन्यांवर बदनामी केली. तसेच जमीन बळकावल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. या प्रकारणात आपली नाहक बदनामी झाली असून, नवाब मलिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रावल यांनी या तक्रारीत केली आहे.दोंडाईचा येथील कत्तलखान्यास विरोध केला म्हणून मलिक खोटे आरोप करत असल्याचे रावल यांचे म्हणणे आहे.न्यायालयाच्या आदेशाने गुन्हायाप्रकरणी नवाब मलिक यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर याप्रकरणी चौकशी सुरु करण्यात येईल, अशी माहिती शिरपूर उपविभागीय अधिकारी संदीप गावीत यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रnewsबातम्या