शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
3
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
4
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
5
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
6
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
7
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
8
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
9
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
11
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
12
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
13
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
14
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
15
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
16
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
17
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
18
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
19
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळ कुटुंबीयांविरोधात एसीबीकडे तक्रार

By admin | Updated: November 21, 2014 02:42 IST

माजी सार्वजनिक बांधकाममंत्री व आमदार छगन भुजबळ व त्यांच्या कुटुंबियांनी पदाचा गैरवापर करून सुमारे अडीच हजार कोटींची बेहिशेबी

मुंबई : माजी सार्वजनिक बांधकाममंत्री व आमदार छगन भुजबळ व त्यांच्या कुटुंबियांनी पदाचा गैरवापर करून सुमारे अडीच हजार कोटींची बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) केली.दमानिया व सामाजिक कार्यकर्ते संजय खांडेकर यांनी गुरुवारी वरळी येथील मुख्यालयात महासंचालक प्रवीण दीक्षित यांची भेट घेऊन भुजबळ, पुत्र व आमदार पंकज भुजबळ, पुतणे व माजी खासदार समीर भुजबळ यांनी आपल्या लोकप्रतिनिधित्वाचा, मंत्रिपदाचा गैरवापर करून बेहिशेबी मालमत्ता कशी गोळा केली, हे पुराव्यानिशी सादर केल्याची माहिती मिळते.भुजबळ कुटुंबाच्या नावे मुंबईसह महाराष्ट्र, देशात व परदेशात असलेल्या मालमत्तांची यादी दमानिया यांनी एसीबीला दिली. तसेच या मालमत्ता भुजबळ यांच्याच आहेत, हे स्पष्ट करणारे पुरावेही त्यांनी तक्रारीसोबत जोडले आहेत. भुजबळ कुटुंबाने एकूण २ हजार ६५३ कोटींची बेहिशेबी मालमत्ता गोळा केली. त्यापैकी १३३ कोटींच्या मालमत्तेचे पुरावे हाती लागलेले नाहीत. मात्र उर्वरित २५२० कोटींच्या मालमत्तांचे पुरावे मिळवून ते एसीबीला दिले आहेत, असे दमानिया यांनी 'लोकमत'ला सांगितले.भुजबळ, त्यांचे पुत्र पंकज व पुतणे समीर यांच्याविरोधात बेहिशेबी मालमत्ता, मनी लॉण्डरिंग आणि लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यातील कलमांनुसार गुन्हा नोंदवून सखोल तपास करावा, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.दमानिया यांच्या तक्रारीवर नियमांप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येत असल्याचे महासंचालक दीक्षित यांनी सांगितले. (प्रतिनिधी)