शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

महिला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सक्षम यंत्रणा; अतिथी संपादक यशोमती ठाकूर यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 08:15 IST

जागतिक महिला दिनानिमित्त मंत्री यशोमती ठाकूर यांनी सोमवारी मुंबई ‘लोकमत’च्या कार्यालयात अतिथी संपादक म्हणून काम केले. त्यानंतर संपादक सहकाऱ्यांशी संवाद साधताना महिलांचे प्रश्न आणि त्यांच्या सोडवणुकीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील, विभागातील महिलांचे प्रश्न वेगवेगळे आहेत. त्यांची सोडवणूक करण्यासाठी महिला धोरणात विभागनिहाय उपाय सुचविले आहेत. शिवाय, या धोरणाची अंमलबजावणी होत आहे किंवा नाही, याच्या आढाव्यासाठी जिल्हा ते राज्य स्तरावर सक्षम यंत्रणा निर्माण करण्यात असल्याची माहिती महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी सोमवारी दिली.

सक्षमीकरणाच्या प्रवासात चौथे महिला धोरण मैलाचा दगड ठरणार आहे. लवकरच विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात हे धोरण मांडले जाईल. महिला धोरणाने स्थानिक स्वराज संस्थेत महिला आरक्षणाची घोषणा केली. यातून प्रतिनिधीत्व मिळाले तरी सक्षमीकरणाचा मार्ग नव्या धोरणातून सुकर होईल. धोरण व त्यातील उपाय केवळ कागदावर राहू नयेत. त्याची कालबद्ध पद्धतीने अंमलबजावणी झाली पाहिजे, विकासाचे मोजमाप करता येण्याजोगे निर्देशांक निश्चित  केले आहेत. या अंमलबजावणीचा नियमितपणे आढावा घेतला जाईल. त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती, महिला व बाल विकास मंत्र्यांची कृती समिती ते जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची सुकाणू समिती असेल, असे मंत्री ठाकूर यांनी स्पष्ट केले.

कोरोना काळाने महिलांचे प्रश्न प्रकर्षाने अधोरेखित केल्याचे मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या,  या काळात ९१४ बाल विवाह रोखण्यात आले. पण, परस्पर वा गुपचूप झालेल्या विवाहांचे काय? त्यामुळेच महिला सक्षमीकरण आणि सन्मानासाठी निश्चित कार्यपद्धती असलेल्या महिला धोरणाची आवश्यकता भासत आहे.

स्थानिक पातळीवर आरक्षणामुळे महिलांना प्रतिनिधीत्व मिळाले. पण, आजही अनेक ठिकाणी सभापती पती, नगरसेविका पती असे चित्र आहे. विविध समित्यांचे सभापती पद भूषविणाऱ्या महिला पतीच्या मागे बाईकवर बसून येतात. या महिला सभापतींना ना गाडी, ना बसायला व्यवस्थित जागा. जिल्हा विकासनिधीतील तीन टक्के रक्कम आता पायाभूत सुविधांच्या विकासावर खर्च केला जाणार आहे. त्यामुळे लवकरच हे चित्र बदलेल.

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूरWomenमहिलाWomen's Day Specialजागतिक महिला दिन