शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
4
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
5
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
6
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
7
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
8
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
9
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
10
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
11
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
12
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
13
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
14
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
15
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
16
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
17
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
18
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
19
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
20
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

कुमारिकेवर सामुहिक बलात्कार

By admin | Updated: July 2, 2014 22:30 IST

लोणार येथील एका कुमारिकेवर सामुहीक बलात्कार; मलकापूर येथील घटना; चौघांविरुध्द गुन्हा दाखल.

मलकापूर(बुलडाणा) : रेल्वे स्टेशनवर सोडून देण्याचा बहाणा करून, लोणार येथील एका कुमारिकेवर दोघांनी सामुािक बलात्कार केल्याची घटना मंगळवारी रात्री १0.३0 वाजता मलकापूर येथे घडली. लोणार येथील रहिवासी असलेली २२ वर्षीय सुनिता (काल्पनिक) ही वसई (मुंबई) येथे मजुरी करते. तिची मावशी बुलडाणा येथील कारागृहामध्ये नोकरीला आहे. मावशीची न्यायालयाची तारीख असल्याने सुनिता ही मावशीचे पती विजयसिंग रामकुमारसिंग यांच्यासोबत १ जुलै रोजी बुलडाणा येथे आली होती. बुलडाणा येथून पुन्हा मुंबई येथे जाण्याकरिता सुनिता आणि विजयसिंग रामकुमारसिंग मंगळवारी रात्री ८ वाजता मलकापूर बसस्थानकावर पोहोचले. त्यावेळी ऑटोचालक सतिष वासुदेव दाणे (वय २४, रा. माता महाकालीनगर, मलकापूर), रविंद्र पांडुरंग कवळकार (वय २८, रा.हनुमाननगर, मलकापूर) आणि दिलीप प्रल्हाद उंबरकार (वय २0, रा.संत ज्ञानेश्‍वरनगर, मलकापूर) या तिघांनी त्यांना मुंबईला जाण्यासाठी रेल्वे असल्याचे सांगीतले. रेल्वे स्टेशनवर सोडून देण्यासाठी सुनिता व तिच्या मावशीचे पती शरद शालीग्राम पाटील (वय २८, रा.गणवाडी, मलकापूर) याच्या ऑटोमध्ये बसले. याच ऑटोमध्ये आरोपी सतिष वासुदेव दाणे आणि रविंद्र पांडुरंग कवळकार हेदेखील बसले; मात्र ऑटोचालकाने ऑटो रेल्वेस्टेशनकडे नेण्याऐवजी हनुमान चौकातून सरळ मुकुंद नगरकडे वेगात नेला. त्यामुळे सुनिता आणि विजयसिंग रामकुमारसिंग यांना संशय आला. त्यांनी धावत्या ऑटोमधून उडी मारली. त्यानंतर ऑटोचालक आणि त्याच्यासोबतच्या दोन आरोपींनी विजयसिंग रामकुमारसिंग यांना मारहाण केली. त्यांना जखमी अवस्थेत सोडून आरोपी सतीष दाणे व रवींद्र पांडूरंग कवळकर यांनी कुमारिकेला ऑटोरिक्षामध्ये बसवून, मुकुंद नगरजवळच्या शेतात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. ऑटोचालक शरद पाटील हा आरोपींना तिथेच सोडून निघून गेला. विजयसिंग रामकुमारसिंग यांनी ताबडतोब शहर पोलीस स्टेशन गाठून घटनेची हकीकत सांगितली. शहर पोलीसांनी नाकाबंदी करुन, आरोपींना काही तासातच अटक केली. गुन्ह्यात वापरलेला एम.एच.२८ टी ७0४ क्रमांकाचा आणि एक विनाक्रमांकाचा ऑटो, असे दोन ऑटो पोलिसांनी जप्त केले. पीडित कुमारिकेच्या फिर्यादीवरुन मलकापूर शहर पोलिसांनी आरोपी सतिष वासुदेव दाणे, शरद शालीग्राम पाटील, रविंद्र पांडुरंग कवडकार आणि दिलीप प्रल्हाद उंबरकार यांच्याविरूद्ध भादंवि कलम ३७६ (२) (ड), ३६६, ५0६ गुन्हा दाखल केला. ** पीडित कुमारिका आणि विजयसिंग रामकुमारसिंग हे मलकापूर बसस्थानकावर गाडीच्या प्रतिक्षेत होते, तेव्हा सतिष वासुदेव दाणे, रविंद्र पांडुरंग कवळकार आणि दिलीप प्रल्हाद उंबरकार या तिघांनी त्यांना मुंबईला जाण्यासाठी रेल्वे असल्याचे सांगितले. रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी त्यांनी दोघांना शरद पाटील याच्या ऑटोत बसविले. त्याचवेळी सतीष दाणे आणि रवींद्र पांडूरंग कवळकर हे दोघेदेखील ऑटोमध्ये बसले. दिलीप उंबरकर मात्र बसला नाही. सतीष दाणे आणि रवींद्र पांडूरंग कवळकर या दोघांनी कुमारिकेवर बलात्कार केल्यानंतर, दिलीप उंबरकर हादेखील घटनास्थळी पोहोचला. त्याने कुमारिकेचा शोधही घेतला; मात्र अंधारात लपून बसल्याने ती वाचली.