शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

कर्जाच्या पुनर्गठणासाठी समिती

By admin | Updated: April 10, 2017 04:07 IST

अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांच्या कर्जाच्या पुनर्गठणाबाबत व कर्जाला शासकीय हमी देण्याबाबत

मुंबई : अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांच्या कर्जाच्या पुनर्गठणाबाबत व कर्जाला शासकीय हमी देण्याबाबत वित्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून पंधरा दिवसांत धोरण तयार करण्यात येईल. तसेच साखर कारखान्यांकडील स्वनिर्मित वीज वापरावरील विद्युत दरांबाबत व वीज खरेदी कराराबाबतही समिती नेमून पंधरा दिवसांत निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. साखर उद्योगाच्या प्रश्नांसंदर्भात रविवारी मुंबईत बैठक झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख, ग्रामविकासमंत्री आणि साखर संघाच्या प्रतिनिधी पंकजा मुंडे, साखर फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील आदी नेते बैठकीस उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला साखर आयुक्त विपिन शर्मा यांनी साखर उद्योगापुढील विविध समस्यांबाबत सादरीकरण केले. कारखान्यांनी उभारलेल्या सहवीज निर्मिती प्रकल्पातील वीज खरेदी थंडावल्याने साखर उद्योग अडचणीमध्ये सापडला आहे. राज्य सरकारने कारखान्याबरोबर वीज खरेदीचे करार करावेत. वीज दर योग्य ठेवले नाहीत तर कारखानदारी धोक्यात येईल, अशी मागणी कारखाना संघाकडून करण्यात आली. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, सहवीज प्रकल्पातून निर्माण होणारी वीज पर्यावरणपूरक असल्याने त्याला अधिक दर मिळावा यासाठी राज्य सरकार लवकरच निर्णय घेईल. कर्ज पुनर्गठण आणि कर्ज हमीसंदर्भात धोरण बनवण्यासाठी समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. (प्रतिनिधी)या विषयांवर झाली चर्चाराज्यातील साखर कारखान्यांवरील कजार्चा बोजा ६ हजार कोटींवर गेला आहे. कर्जाचे पुनर्गठण न झाल्यास पुढचा हंगाम कारखाने घेऊ शकणार नाहीत. परिणामी दहा लाख ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत येतील, असे कारखान्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले. कारखान्यांना शासन थकहमी देणे, साखरेवरील सेस रद्द करणे, साखरेची आयात, साखर कारखान्यांवरील आयकराची मागणी, कारखान्यांचे सहवीज प्रकल्प, इथेनॉल पुरवठा इत्यादी विषयांवर बैठकीत चर्चा झाली.