शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक प्रक्रियेदरम्यान आयोगाचा गोंधळ,ग्रामपंचायतीसाठी सोमवारी मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 23:36 IST

मार्च ते मे महिन्यात मुदत संपणाºया ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत जवळ आली असताना राज्य निवडणूक आयोगाने ‘गोंधळी’ कारभाराची प्रचिती दिली आहे. नामांकनास मुदतवाढ देतानाच छाननीही लांबणीवर टाकल्यामुळे उमेदवार व निवडणूक अधिकाºयांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

नाशिक : मार्च ते मे महिन्यात मुदत संपणाºया ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत जवळ आली असताना राज्य निवडणूक आयोगाने ‘गोंधळी’ कारभाराची प्रचिती दिली आहे. नामांकनास मुदतवाढ देतानाच छाननीही लांबणीवर टाकल्यामुळे उमेदवार व निवडणूक अधिकाºयांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.मुदत संपणाºया ग्रामपंचायतीचे सदस्य तसेच थेट सरपंच निवडणुकीबरोबरच रिक्तपदांसाठी २५ फेब्रुवारीला निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करणाºया राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचना जानेवारी महिन्यातच प्रसिद्ध केली होती. त्यानुसार ५ ते १० फेब्रुवारी आॅनलाइन नामांकन, १२ फेब्रुवारीला छाननी तर माघारीसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत अंतिम मुदत होती. राखीव जागांसाठी उमेदवारांनी नामांकनासोबत जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य केले होते. आयोगाच्या या निर्णयामुळे उमेदवार निवडणुकीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाल्याने राज्य सरकारला त्यात हस्तक्षेप करावा व मंत्रिमंडळ बैठकीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली. त्यानंतर निवडणूक आयोगाने अधिसूचनेत बदल केला, तर १० फेब्रुवारी नामांकन स्वीकारण्याची अंतिम मुदत असताना आयोगाने शुक्रवारी रात्री निवडणूक कार्यक्रमातच आश्चर्यकारकरीत्या बदल केला.नवीन निवडणूक कार्यक्रमानुसार आता १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत उमेदवारांना नामांकन दाखल करता येईल. १४ रोजी छाननी, १६ रोजी माघार व २७ फेब्रुवारीला मतदान होऊन दुसºया दिवशी मतमोजणी होईल. ऐनवेळच्या फतव्यामुळे निवडणूक अधिकाºयांची धावपळ उडाली असून, शनिवार, रविवार सुटी आल्याने ग्रामपंचायतींपर्यंत आयोगाचा कार्यक्रम कसा पोहोचवायचा, असा प्रश्न पडला आहे.अधिकाºयांची तारेवरची कसरतनव्या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी अधिकाºयांना धावपळ करावी लागत आहे. उमेदवारांचा शोध घेऊन त्यांना १४ रोजी अर्जाची छाननी होणार असल्याचे पत्र द्यावे लागणार आहे. एखाद्या उमेदवाराला पत्र न मिळाल्यास त्याच्याकडून न्यायालयात निवडणुकीला आव्हान दिले जाण्याचीही शक्यता नाकारता येणार नाही.शासकीय वेळेनंतर नामांकननवीन कार्यक्रमानुसार आयोगाने सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत नामांकनाची मुदत वाढविली आहे. शासकीय कामकाजाची मुदत टळून गेल्यावर सहानंतर कर्मचाºयांना काम करावे लागणार आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकNashikनाशिक