असे आहे आयुक्त कार्यालय !

By admin | Published: July 25, 2014 12:53 AM2014-07-25T00:53:37+5:302014-07-25T00:53:37+5:30

विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात अनेक कल्पवृक्ष आणि काही चमत्कारिक स्थळे आहेत. कोणतेही तंत्रमंत्र न करताच भ्रष्टाचारी आणि त्यांच्या हस्तकांना या स्थळांवर पोहचताच झटपट नोटा (मोठी रक्कम) प्राप्त होतात.

The Commissioner's Office! | असे आहे आयुक्त कार्यालय !

असे आहे आयुक्त कार्यालय !

Next

परिसरात कल्पवृक्ष अन् चमत्कारिक स्थळे : भ्रष्टाचाऱ्यांना मिळतात झटपट नोटा
नरेश डोंगरे -नागपूर
विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात अनेक कल्पवृक्ष आणि काही चमत्कारिक स्थळे आहेत. कोणतेही तंत्रमंत्र न करताच भ्रष्टाचारी आणि त्यांच्या हस्तकांना या स्थळांवर पोहचताच झटपट नोटा (मोठी रक्कम) प्राप्त होतात. होय, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी दुपारी केलेल्या कारवाईनंतर ही चक्रावून टाकणारी माहिती उघड झाली.
विभागीय आयुक्त कार्यालयाची इमारत अनेक वैशिष्ट्यांमुळे सर्वपरिचित आहे. जुने सचिवालय म्हणूनही ही इमारत ओळखली जाते. इमारतीच्या एका बाजूला सिंचन विभागाचे कार्यालय तर समोर जिल्हा परिषद आहे. थोड्या अंतरावरच नवीन प्रशासकीय इमारत असून, बाजूलाच जुनी प्रशासकीय इमारतही आहे. या इमारतींमध्ये अनेक शासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे येथे रोज हजारो नागरिकांचा राबता असतो. मोठी वर्दळ असल्याने येथे बाजारही भरतो. हॉटेल, चहा टपऱ्यांमध्ये झुनका भाकरीपासून आलुबोंडा-वड्यापर्यंतचे खाद्यपदार्थ अन् पालेभाज्यांपासून फळांपर्यंतची दुकानेही सजलेली पहायला मिळतात. सकाळी ११ ते सायंकाळी ६ पर्यंत या परिसरात गर्दी दिसते. विविध विभागांची कार्यालये असलेल्या याच परिसरात पोलीस नियंत्रण कक्ष आहे. दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) कार्यालय आहे. गोंदिया-गडचिरोली परिक्षेत्राच्या पोलीस महानिरीक्षकांचे आणि गुन्हेशाखेचे कार्यालय आहे. याच ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचेही कार्यालय आहे. त्यामुळे की काय भ्रष्टाचारी लोकसेवक आपल्या कार्यालयात किंवा कक्षात लाचेची रक्कम स्वीकारणे टाळतात. त्यांनी लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी काही विशिष्ट ठिकाणं निश्चित केली आहेत. आयुक्त कार्यालयाच्या चोहोबाजूने छोटीमोठी झाडे आहेत. त्यातील काही झाडे भ्रष्ट लोकसेवकांसाठी कल्पवृक्ष ठरली आहेत.

Web Title: The Commissioner's Office!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.