मुंबई : राज्यात २८ विमानतळे असून, त्यापैकी २१ विमानतळे व्यावसायिकदृष्ट्या वापरण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. याकरिता काही विमानतळांचे आधुनिकीकरण केले जाणार असून, काही विमानतळांच्या धावपट्ट्यांची लांबी वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे या विमानतळांवर रात्रीच्या वेळी विमाने उतरवणे सोपे होईल, असे ते म्हणाले.मुनगंटीवार म्हणाले की, ‘राज्यातील मुंबई, पुणे, औरंगाबाद व नागपूर या विमानतळांचा व्यावसायिकदृष्ट्या वापर केला जातो. इतक्या मोठ्या प्रमाणावर विमानतळे असणारे दुसरे राज्य नाही. महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्याकरिता व औद्योगिकदृष्ट्या राज्याचा प्रथम क्रमांक टिकवून ठेवण्याकरिता विमानतळांचा व्यावसायिक वापर करणे गरजेचे आहे. २०१६पर्यंत सर्वत्र सायबर लॅबराज्यातील सर्व जिल्ह्यांत २८ फेब्रुवारी २०१६पर्यंत सायबर क्राइम लॅब सुरू करण्यात येणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. अर्थसंकल्पात याकरिता तरतूद केली असून, या लॅबमुळे सायबर गुन्हेगारी रोखण्यात मोठ्या प्रमाणावर यश मिळणार असल्याचे ते म्हणाले.
राज्यातील २१ विमानतळांचा व्यावसायिक वापर
By admin | Updated: August 11, 2015 01:54 IST