शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

व्यावसायिक वाहतूकदार आजपासून जाणार संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 06:01 IST

खासगी बस, ट्रक, टँकर व टेम्पो यांचा समावेश; १३ लाखांहून अधिक वाहने राहणार बंद

मुंबई : वाहतूकदारांच्या उद्या, शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या बेमुदत देशव्यापी संपात राज्यातील १३ लाखांहून अधिक व्यावसायिक वाहने सहभागी होत असून, त्यात ट्रक, खासगी बसेस, टँकर व टेम्पो यांचा समावेश असेल. संपात राज्यातील १0 लाख ट्रकमालक सहभागी होणार आहेत. दीड लाख टेम्पोमालकही संपात सहभागी होत आहेत.टँकरमालकांनीही संपाला पाठिंबा दिल्याने दूध, पेट्रोल-डिझेल पुरवठ्यावर परिणाम होईल. राज्यातील १ लाखपैकी ३० टक्के टँकर्स तेल कंपन्यांकडे आहेत. ते संपात नसले तरी उर्वरित टँकर्सद्वारे पेट्रोल-डिझेलचा पुरवठा होणार नाही. शहरांतर्गत वाहतूक करणारे पाच चाकी,तीन चाकी छोटे टेम्पो वैयक्तिकउपयोगाचे असल्याने ते संघटनेत व संपात सहभागी नाहीत.संपकाळात वाहतूक सुरळीत राहण्याच्या दृष्टीने सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांत नियंत्रण कक्ष २४ तास सुरू राहतील. संपात नसलेल्यांना पोलीस संरक्षण दिले जाईल. संपकाळात एसटी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बसेसचा वापर केला जाईल.नागपुरातील संघटनेशी संलग्न पाच जिल्ह्यांमधील वाहतूकदारांच्या संघटनांनी संपातून माघार घेतली. त्यामुळे संपाचा नागपूरसह पूर्व विदर्भावर परिणाम नाही.स्कूल बसही सहभागीस्कूल बस मालकांच्या संघटनेने गुरुवारी सायंकाळी या संपाला पाठिंबा जाहीर केला. त्यानुसार शुक्रवारी सकाळी विद्यार्थ्यांना घ्यायला स्कूल बस येणार नाहीत, याची पालकांनी नोंद घेणे आवश्यक आहे.

टॅग्स :Strikeसंप